शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

सोनिया गांधीसमोरच दोन नेते भिडले; मुख्यमंत्री अन् राज्यसभा खासदार आमनेसामने

By कुणाल गवाणकर | Updated: January 22, 2021 16:06 IST

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून पक्षात दोन गट; वर्किंग कमिटीच्या बैठकीत वाकयुद्ध

नवी दिल्ली: काँग्रेस पक्षात निर्णय घेण्याचे सर्वोच्च अधिकार असलेल्या काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक पार पडली आहे. काँग्रेस अध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीबद्दल बैठकीत चर्चा झाली. यावेळी पक्षातील मतभेद स्पष्टपणे समोर आले. काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीबद्दल पक्षात दोन मतप्रवाह आहेत. या दोन गटांच्या नेत्यांमध्ये असलेलं वितुष्ट आजच्या बैठकीत दिसून आलं. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली वर्किंग कमिटीची बैठक झाली. त्यात काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार आनंद शर्मा आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आमनेसामने आले. शर्मा आणि गेहलोत यांच्यात अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून जोरदार जुंपली. येत्या जून महिन्यात काँग्रेसचा अध्यक्ष निवडला जाईल असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.अशोक गेहलोत आणि आनंद शर्मांमध्ये वाकयुद्धकाँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत अशोक गेहलोत आणि आनंद शर्मा यांच्यात जोरदार जुंपली. तुम्ही दर ६ महिन्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मागणी करता. तुम्हाला पक्ष नेतृत्त्वावर विश्वास नाही का, असा सवाल गेहलोत यांनी शर्मांना विचारला. या वादात पक्षाच्या वरिष्ठ नेत्या अंबिका सोनी यांना मध्यस्थी करावी लागली. दोन्ही नेत्यांनी जास्त भावुक होऊ नका, असं आवाहन करत सोनी यांनी गेहलोत आणि शर्मा यांना शांत केलं.काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीनंतर पक्षाचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी माध्यमांशी संवाद साधला. जून २०२१ मध्ये पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. खासदार राहुल गांधींनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यापासून काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष नाही. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळत आहेत. काही महिन्यांपूर्वी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी सोनिया यांना पत्र लिहिलं होतं. पक्षाला पूर्ण वेळ अध्यक्ष द्या, अशी मागणी पत्रातून करण्यात आली होती. या पत्रामुळे काँग्रेसमधील गटातटाचं राजकारण पुन्हा दिसून आलं होतं.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीAshok Gahlotअशोक गहलोतRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस