नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. जवळपास दीड महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. आज आंदोलक शेतकऱ्यांचे नेते आणि केंद्र सरकारमधील मंत्र्यांची बैठक कोणत्याही तोडग्याविना संपली. त्यामुळे आता १५ जानेवारीला शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये नवव्यांदा बैठक होईल. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.काँग्रेस अध्यक्ष यांनी एका ट्विटच्या माध्यमातून मोदी सरकारच्या हेतूंवरच शंका उपस्थित केली आहे. आज शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये आठव्यांदा बैठक झाली. मात्र ती निष्फळ ठरली. यानंतर राहुल यांनी एक ट्विट केलं. 'ज्यांचा हेतू स्वच्छ नाही, त्यांची रणनीती पुढच्या तारखा देणे आहे,' असा टोला राहुल यांनी लगावला.
Farmer Protest: ज्यांचा हेतूच स्वच्छ नाही...; शेतकरी आंदोलनावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
By कुणाल गवाणकर | Updated: January 8, 2021 22:37 IST