शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
3
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
4
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
5
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
6
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
7
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
8
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
9
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
10
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
11
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
12
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
13
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
14
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
15
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
16
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
17
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
18
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
19
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
20
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...

आचारसंहिता : एक शोभेचा दागिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 02:33 IST

निवडणूक जाहीर झाली की, आचारसंहिता लागू होते. मग, या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या बातम्या येतात. हे उल्लंघन सर्वच पक्षांकडून व सर्वच स्तरांवरील नेत्यांकडून होत असल्याचे दिसून येते.

- अजित गोगटे

निवडणूक जाहीर झाली की, आचारसंहिता लागू होते. मग, या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याच्या बातम्या येतात. हे उल्लंघन सर्वच पक्षांकडून व सर्वच स्तरांवरील नेत्यांकडून होत असल्याचे दिसून येते. अशा प्रकरणांत निवडणूक आयोग दोन प्रकारची कारवाई करू शकतो. एक तर चुकार नेत्याला तंबी देणे किंवा प्रमाद गंभीर व वारंवार केलेला असेल, तर ठरावीक काळासाठी प्रचारबंदी करणे. योगी आदित्यनाथ, मायावती, आझम खान व मनेका गांधी यांच्यावर काही दिवसांपूर्वी अशी प्रचारबंदी घातली गेली. दुसरी कारवाई निवडणूक रद्द करण्याची. ही कारवाई एखाद्या मतदारसंघात पैशांचा वारेमाप वापर होताना दिसला, तर केली जाते. तामिळनाडूतील वेल्लोरची निवडणूक याच कारणावरून रद्द केली गेली. याखेरीज, मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, नैसर्गिक आपत्ती, उमेदवाराचे निधन असे काही घडले तरी निवडणूक रद्द केली जाऊ शकते.अनेक वेळा संबंधित उमेदवार किंवा नेत्याविरुद्ध निवडणूक आयोग आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंदवतो. असे शेकडो गुन्हे आजवर नोंदले गेले, पण त्यात कधी कोणाला दोषी ठरवून शिक्षा झाल्याचे एकही उदाहरण दिसत नाही. एक तर निवडणूक उरकल्यानंतर अशी प्रकरणे चालवण्यात कोणाला स्वारस्य राहत नाही. साक्षीदार मिळत नाहीत व निवडणूक आयोगही अशा प्रकरणांचा नंतर हिरिरीने पाठपुरावा करत नाही.राज्यघटनेच्या अनुच्छेद ३२४ अन्वये संसद आणि विधिमंडळांच्या निवडणुका ठरावीक वेळी पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे. यात निवडणुका उरकणे एवढेच अभिप्रेत नाही. त्या स्वतंत्र आणि नि:पक्ष वातावरणात होतील, हे पाहणे हेही आयोगास करावे लागते. यासाठी जे काही करावे लागेल, ते सर्व करण्याचे सर्वाधिकार आयोगास आहेत, असे सर्वोच्च न्यायालयाने वारंवार स्पष्ट केले आहे. हे सांगणे सोपे आहे, पण प्रत्यक्षात करणे कठीण आहे. निवडणुकीत धाकदपटशा करणे, मतदारांना पैशांची अथवा अन्य लालूच दाखवणे, जात किंवा धर्माच्या नावाने मते मागणे, प्रचाराच्या नावाखाली प्रतिस्पर्ध्याचे चारित्र्यहनन करणे या सर्व गोष्टी लोकप्रतिनिधित्व कायद्याने निषिद्ध ठरवल्या आहेत. हे सर्व निवडणुकीशी संबंधित गुन्हे मानले गेले आहेत व यापैकी कोणत्याही मुद्द्यावर न्यायालयाकडून विजयी उमेदवाराची निवडणूक रद्द केली जाऊ शकते. पण, ही न्यायालयीन प्रक्रिया निवडणूक उरकल्यानंतरची आहे. असे गैरप्रकार करणाऱ्या उमेदवाराला विजयी होण्यापासून रोखण्यास त्याचा काहीच उपयोग नाही. एखाद्या मतदारसंघात धर्म किंवा जातीच्या आधारे ध्रुवीकरण होईल, असा उघड प्रचार केला गेला तरी निवडणूक आयोग फारसे काही करू शकत नाही. त्यातून अगदीच गंभीर परिस्थिती उद््भवली तर ती निवडणूक पूर्णपणे रद्द केली जाऊ शकते. परंतु, एखाद्या उमेदवाराची उमेदवारी रद्द करणे किंवा एखाद्या पक्षास दिलेले निवडणूक चिन्ह त्या मतदारसंघापुरते रद्द करणे, असा कोणताही अधिकार आयोगास नाही. त्यामुळे कायद्याने निषिद्ध ठरवलेल्या बाबी असोत किंवा आचारसंहिता असो, निवडणुकीचे वातावरण कलुषित व गढूळ न होण्यासाठी त्यांचा फारसा काही उपयोग होत नाही.बरं, झालेली निवडणूक वर उल्लेखिलेल्या कोणत्याही कारणाने रद्द करून घ्यायची असेल, तर त्यासाठी पराभूत उमेदवार किंवा एखादा मतदार त्यासाठी याचिका करू शकतो. अशी याचिका करण्याचा अधिकार आयोगास नाही. म्हणजे, एखादा उमेदवार गैरमार्गाने विजयी झाल्याचे दिसत असले, तरी आयोग गप्प बसतो. अशी प्रकरणे जेव्हा न्यायालयात जातात, तेव्हा सर्व गोष्टी चोख साक्षी-पुराव्यांनी सिद्ध करण्याचे दिव्य त्या पराभूत उमेदवारास करावे लागते. आयोग यासाठी काही पुढाकार घेत नाही किंवा साक्ष द्यायला स्वत:हून पुढेही येत नाही. जे निवडणूक काळात, तेच एरव्हीही दिसते. आयोगाला राजकीय पक्षांची फक्त नोंदणी करण्याचा अधिकार आहे. त्यांना मान्यता देण्याचा किंवा मान्यता रद्द करण्याचा अधिकार नाही. तुम्ही निवडणूक कायद्याचे वारंवार उल्लंघन करत असल्याने तुमची नोंदणी रद्द करत आहोत किंवा तुम्हाला दिलेले निवडणूक चिन्ह काढून घेत आहोत, असे आयोग राजकीय पक्षांना सांगू शकत नाही. त्यामुळे पक्षाची नोंदणी व मान्यता टिकवण्याशी निवडणुकीतील आचार-विचाराशी काही संबंध नसल्याने राजकीय पक्षांना व त्यांच्या नेत्यांना वठणीवर आणता येईल, असे निवडणूक आयोग काहीही करू शकत नाही.आचारसंहितेचे धिंडवडे का काढले जातात, याचे उत्तर आचारसंहिता म्हणजे काय, याच्यात आहे. आचारसंहिता हा संसदेने केलेला कायदा नाही. निवडणूक प्रचाराच्या काळात आचार-विचार कसे असावेत, याचे सर्व पक्षांच्या संमतीने तयार केलेले ते स्वयंशिस्तीचे नियम आहेत. आचारसंहितेस एक शोभेचा दागिना म्हणता येईल. नाही घातला म्हणून काही बिघडत नाही. घातला तर दिसायला जरा बरे दिसते, एवढेच.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग