शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

२०२४ मध्ये भाजपाला मिळतील ४०० हून अधिक जागा, चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं कारण

By बाळकृष्ण परब | Updated: January 7, 2021 15:43 IST

Chandrakant Patil News : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

ठळक मुद्देमोदी सरकारने घेतलेले निर्णय पाहता २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतीलकाँग्रेसचे बसमध्ये बसवून नेता येतील एवढेच खासदार निवडून येतील२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत देशाची एकहाती सत्ता मिळवली होती

कणकवली - २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत देशाची एकहाती सत्ता मिळवली होती. दरम्यानच्या काळात भाजपाचा देशातील अनेक राज्यांमध्ये मोठा विस्तार झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत मोठे भाकित केले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांना समर्थन देण्यासाठी भाजपाने आज कणकवलीमध्ये ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये आमदार नितेश राणे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते. या रॅलीनंतर झालेल्या सभेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. हे निर्णय पाहता २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाला ४०० हून अधिक जागा मिळतील. तर काँग्रेसचे बसमध्ये बसवून नेता येतील एवढेच खासदार निवडून येतील, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.सध्या केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३०३ हून अधिक जागा जिंकल्या होत्या. त्या विजयाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग दोन निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमतासह सत्ता स्थापन करण्याचा मान मिळवला होता.दरम्यान, या सभेमध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या राहुल गांधी आणि मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली. केंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी हिताचा आहे. नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांवरील बहुतांश बंधने काढून टाकण्यात आली आहेत. या केंद्र सरकारचे काही चुकलेले नाही. दिल्ली आणि अन्य ठिकाणी सुरू असलेली आंदोलने ही राजकीय आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीमधील काय समजते? ते या कायद्याला विरोधच करणार, अशी टीका नारायण राणे यांनी केली.केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यांच्या नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. कृषी कायद्याच्या समर्थनार्थ कणकवली येणे आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित होते. ''मी राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेत कृषी विधेयक सादर करण्यात आले तेव्हा त्यावर चांगली चर्चा झाली. विरोधकांपैकी कुणीही कृषी विधेयकाला विरोध दर्शवला नाही. याउलट अनेक विरोधक सदस्यांनी या विधेयकाचे कौतुकच केले. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काँग्रेसला संधी असून, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही केले नाही. आता विरोध करताहेत. आंदोलन करताहेत. शेतकऱ्यांवर बंधने लादणारे कायदे व नियम मोडीत काढण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले'', असे नारायण राणे यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदीElectionनिवडणूकPoliticsराजकारण