शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

अरबपती कर्जबुडवे फरार, शेतकरी मात्र तुरुंगात- राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 03:44 IST

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणार

संगमनेर (अहमदनगर) : कर्जबुडवे अरबपती उद्योगपती फरार झाले आहेत आणि शेतकऱ्यांना २० हजार रुपयांसाठी तुरुंगात टाकले जात आहे़ मात्र, काँगे्रस सत्तेत आल्यास थकबाकीदार शेतकºयाला अटक करता येणार नाही, असा कायदा करणार आहे़ तसेच शेतकºयांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्पही मांडणार आहे, असे काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे सांगितले.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी रात्री त्यांची सभा झाली. काँगे्रसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ उपस्थित होते.राहुल यांनी मोदी सरकारच्या आश्वासनांचे वाभाडे काढले़ ते म्हणाले, मोदी यांनी २ कोटी रोजगार देण्याचे, शेतमालास दुप्पट भाव, १५ लाख देण्याचे आश्वासन दिले होते़ प्रत्यक्षात हे काहीही झालेले नाही़ त्यांनी केवळ अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, निरव मोदी, विजय मल्ल्या यांच्यावर कर्जांची खैरात केली़ मल्ल्या, चोक्सी, मोदी हे उद्योगपती कर्ज बुडवून परदेशात पळाले़ मोदींनी उद्योगपतींचे ५़५५ कोटींचे कर्ज माफ केले़ मात्र, गरिबांना काहीच दिले नाही़ अर्थव्यवस्थेला धक्का न लावताही काँगे्रस गरिबांच्या खात्यावर न्याय योजनेतून प्रत्येक महिन्याला ६ हजार रुपये व वर्षाला ७२ हजार रुपये देणार आहे़ यातून २५ कोटी लोकांना फायदा होणार आहे़ सध्या देशात २२ लाख सरकारी पदे रिक्त आहेत़ या सर्व नोकºया काँगे्रस सरकार तरुणांना देईल़ १० लाख तरुणांना पंचायतींत रोजगार मिळेल़ काँगे्रस सत्तेत आल्यास शेतकºयांसाठी स्वतंत्र बजेट तयार केले जाईल़ राफेल प्रकरणात मोदी हे फ्रान्सच्या कंपनीशी समांतर बोलणी करीत आहेत, असा ठपका हवाई दलाने ठेवलेला आहे़ ३० हजार कोटी रुपये मोदींनी राफेलमध्ये अनिल अंबानींना दिले आहेत़ यांचा कारभार सत्याचा कसा, असा प्रश्न त्यांनी केला़राधाकृष्ण विखे यांचा गद्दार म्हणून उल्लेखअशोक चव्हाण यांनी सभेत राधाकृष्ण विखे यांना गद्दार म्हणून संबोधले. विखे शुक्रवारी शिर्डीत सेनेच्या व्यासपीठावर होते. तो संदर्भ देत ते म्हणाले, जे आज सेनेच्या व्यासपीठावर आहेत त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन तिकडे जावे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Rahul Gandhiराहुल गांधी