शहरं
Join us  
Trending Stories
1
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
2
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
3
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
4
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
5
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
6
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
7
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
8
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
9
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
10
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
11
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
13
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
14
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
15
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
16
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
17
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
18
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
19
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
20
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले

Bihar Assembly Election Results: आमचे ११९ उमेदवार विजयी; नितीश कुमारांवर आरोप करत राजदकडून थेट यादीच प्रसिद्ध 

By कुणाल गवाणकर | Updated: November 10, 2020 22:43 IST

Bihar Assembly Election Results: निवडणूक अधिकारी विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र देत नसल्याचा दावा

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू आहे. मात्र निकालांमध्ये घोळ घालण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलानं केला आहे. मतमोजणी आणि निकालात गडबड होतेय. जिंकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रं दिली जात नाहीत. मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप राजदकडून करण्यात आला आहे. महागठबंधनमधील सर्व पक्षांनी याबद्दलची तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.महागठबंधनचे ११९ उमेदवार विजयी झाल्याचा दावा राजदनं केला आहे. राजदनं विजयी उमेदवारांची यादीच ट्विट केली आहे. 'ही महागठबंधनच्या ११९ विजयी उमेदवारांची यादी आहे. रिटर्निंग ऑफिसरनं या उमेदवारांचं विजयाबद्दल अभिनंदन केलं. मात्र आता ऑफिसर त्यांना प्रमाणपत्र देत नाहीत. तुम्ही पराभूत झाला आहात, असं सांगितलं जात आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही यांची नावं विजयी म्हणून दाखवली जात आहेत,' असं राजदनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. 'जवळपास १० जागांवर नितीश प्रशासन मतमोजणीस उशीर करत आहे. जिंकलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रं दिली जात नाहीत. मुख्यमंत्री निवासस्थानात बसून नितीश कुमार आणि सुशील मोदी मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांच्या माध्यमातून सर्व डीए आणि आरओंना फोन करत आहेत. अटीतटीच्या लढतीत आमच्या बाजूनं निकाल द्या, यासाठी त्यांच्याकडून दबाव आणला जात आहे,' असा आरोप राजदनं ट्विट करून केला आहे. 'नितीश कुमार, सुशील मोदी मुख्यमंत्री निवासस्थानात बसून सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. महागठबंधनला कोणत्याही परिस्थितीत १०५-११० जागांवर रोखण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जनमताची लूट होऊ देणार नाही,' असं राजदनं दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. राजद नेते मनोज झा यांनीदेखील नितीश सरकारवर निशाणा साधला आहे. 'निकाल बदलले जात आहेत. महाराजगंज, त्रिवेणीगंज, कटिहार यासारख्या अनेक जागांवर प्रमाणपत्रं दिली जात नाहीएत. मतमोजणी लांबवण्यासाठी चालढकल सुरू आहे,' असा आरोप झा यांनी केला. नितीश कुमार आता अवघे काही तास मुख्यमंत्री असणार आहेत. त्यांनी स्वत:वर आणखी शितोंडे उडवून घेऊ नयेत, असंदेखील झा यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलJanta Dal Unitedजनता दल युनायटेडNitish Kumarनितीश कुमार