पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षाने आपल्या ११५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, नितीशकुमार यांच्या पक्षाने अनेक वादग्रस्त व्यक्तींनाही उमेदवारी दिली आहे. अशा वादग्रस्त उमेदवारांपैकी एक नाव आहे मंजू वर्मा. मंजू वर्मा यांना जेडीयूने चेरिया बरियारपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.गतवर्षी गाजलेल्या मुझफ्फरपूर बालिकागृह कांड प्रकरणी नितीश सरकारमधील समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. या प्रकरणामध्ये बालिकागृहामधील ३४ मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मंजू वर्मा यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. तसेच त्यांचा राजीनामा घेऊन जेडीयूने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. या प्रकरणामध्ये मंजू वर्मा यांचे पकी चंद्रशेखर वर्मा यांचेही नाव आले होते.या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी मंजू वर्मा यांच्या घरी छापेमारी केली होती. त्यावेळी त्यांच्या घरातून अवैध हत्यारे आणि काडतूस जप्त करण्यात आले होते. त्यानंतर मंजू वर्मा आणि त्यांच्या पतीला अटक करण्यात आली होती. मात्र नंतर त्यांना न्यायालयाने जामीन दिला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी मंजू वर्मा यांनी नितीश कुमार यांची भेट घेतली होती. तसेच या भेटीनंतर सगळे काही सुरळीत झाल्याचे प्रसारमाध्यमांना सांगितले होते. अखेर आज त्यांना जेडीयूने उमेदवारी जाहीर केली.दरम्यान, लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजप्रताप यांचे सासरे चंद्रिका राय यांनाही जेडीयूने उमेदवारी दिली आहे. ते परसा विधानसभा मतदासंघामधून विवडणूक लढवणार आहेत. चंद्रिका राय यांची कन्या आणि तेजप्रताप यांची पत्नी ऐश्वर्या राय यांच्यासोबत झालेल्या अपमानजनक व्यवहारामुळे चंद्रिका राय यांनी आरजेडी सोडून जेडीयूमध्ये प्रवेश केला होता.तर सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वादास सुरुवात झाल्यापासून बरेस चर्चेत असलेले बिहार पोलिसांचे तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांना पक्षप्रवेशानंतरही जेडीयूने उमेदवारी दिलेली नाही. बिहार विधानसभेची निवडणूक जवळ येताच गुप्तेश्वर पांडेंनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा देत थेट राजकारणात उडी घेतली होती. पांडे यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केल्यानंतर बक्सर जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवतील. अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र जेडीयूने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आज जाहीर केलेल्या ११५ उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचं नावच नसल्याने आता पांडे यांचं काय होणार याची चर्चा रंगली आहे.
Bihar Assembly Election 2020 : मुझफ्फरपूर शेल्टर होम केसमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मंजू वर्मांना एनडीएने दिली उमेदवारी
By बाळकृष्ण परब | Updated: October 7, 2020 23:58 IST
Bihar Assembly Election 2020 News: गतवर्षी गाजलेल्या मुझफ्फरपूर बालिकागृह कांड प्रकरणी नितीश सरकारमधील समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. या प्रकरणामध्ये बालिकागृहामधील ३४ मुलींवर अत्याचार झाल्याचे समोर आले होते.
Bihar Assembly Election 2020 : मुझफ्फरपूर शेल्टर होम केसमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मंजू वर्मांना एनडीएने दिली उमेदवारी
ठळक मुद्देजनता दल युनायटेड पक्षाने आपल्या ११५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहेनितीशकुमार यांच्या पक्षाने अनेक वादग्रस्त व्यक्तींनाही दिली उमेदवारी अशा वादग्रस्त उमेदवारांपैकी एक नाव आहे मंजू वर्मा