शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा हजारे म्हणतात, "ठाकरे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा"

By बाळकृष्ण परब | Updated: November 8, 2020 09:22 IST

Anna Hazare News : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा, अशी परिस्थिती आहे, असा टोला अण्णांनी लगावला आहे.

ठळक मुद्देलोकायुक्तांच्या नियुक्ती कायद्यासाठी मी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्र लिहिलीमुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता कुणीही पत्राला उत्तर दिले नाहीमुख्यमंत्र्यांनीही कोरोनानंतर याबाबत पावले उचलू असे सांगितले

मुंबई - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत आघाडी करून स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला या महिन्याच्या अखेरीस एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा, अशी परिस्थिती आहे, असा टोला अण्णांनी लगावला आहे.एबीपी माझा ह्या वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधताना अण्णांनी ही टीका केली. लोकायुक्तांच्या नियुक्ती कायद्यासाठी मी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्र लिहिली. पण मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता कुणीही पत्राला उत्तर दिले नाही, असे अण्णा हजारेंनी सांगितले.यावेळी अण्णा हजारेंनी महाविकास आघाडीच्या कारभारावरही टीका केली. ते म्हणाले की, ठाकरे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा असा कारभार चालला आहे. लोकपालनंतर लोकायुक्त कायदा करायचा आहे. पण मुख्यमंत्री वगळता इतर मंत्र्यांकडून त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनीही कोरोनानंतर याबाबत पावले उचलू असे सांगितले.दरम्यान, लोकायुक्त कायदा न झाल्यास पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुंकणार असल्याचा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला आहे. त्यामुळे आता अण्णा पुन्हा एकदा लोकायुक्तांचा मुद्दा चर्चेत आणणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीPoliticsराजकारण