शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

"योगीजी बालिशपणाचे खेळ थांबवा, मी लखनऊमध्ये आहे अटक करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 21:22 IST

रविवारी संजय सिंह यांनी योगी सरकारच्या आदेशानुसार पोलिसांनी लखनऊमधील आम आदमी पार्टीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले असल्याचा आरोप केला आहे.

ठळक मुद्देयोगी सरकारच्या आदेशानुसार उत्तर प्रदेशातील पाच जिल्ह्यांत एफआयआर नोंदविण्यात आले आहेत, असा आरोप संजय सिंह यांनी केला आहे.

लखनऊ : आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. रविवारी संजय सिंह यांनी योगी सरकारच्या आदेशानुसार पोलिसांनी लखनऊमधील आम आदमी पार्टीच्या कार्यालयाला कुलूप ठोकले असल्याचा आरोप केला आहे.

संजय सिंह म्हणाले, "योगीजी आम आदमी पार्टीचे कार्यालय बंद करू शकतात, परंतु सत्याचा आवाज थांबवू शकत नाहीत. तुमच्या दडपशाहीविरूद्ध बोलत आहे आणि बोलत राहीन. बालिशपणाचे खेळ थांबवा, मी लखनऊमध्ये आहे, अटक करा." दरम्यान, आम आदमी पार्टीचे ज्या ठिकाणी कार्यालय आहे, त्याचे रेंट अॅग्रीमेंट नसल्याचे पोलिसांच्या सूत्रांकडून समजते.

योगी सरकारच्या आदेशानुसार उत्तर प्रदेशातील पाच जिल्ह्यांत एफआयआर नोंदविण्यात आले आहेत, असा आरोप संजय सिंह यांनी केला आहे. तसेच, तुमच्याकडून गुन्हे, खून आणि बलात्कार यांसारख्या घटना थांबवता येत नाहीत आणि तुम्ही विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता काय? योगीजी तुम्हाला हुकूमशाही आणि दांडक्याने उत्तर प्रदेश चालवायचा आहे का? असे सवाल संजय सिंह यांनी केले आहेत.

याचबरोबर, संजय सिंह म्हणाले, "मी योगी सरकारला राज्यातील सर्व 1700 पोलीस ठाण्यात माझ्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगेन, तरीही मला भीती वाटत नाही. बिघडत चाललेली कायदा व सुव्यवस्था, महाग वीज आणि लोकांवर होणारा अन्याय असे मुद्दे सतत पुढे आणणार आहे. गरज भासल्यास आम्ही रस्त्यावर कार्यालय उघडू. आज ब्राह्मण समाजातील लोक चिंतित आहेत आणि त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. काल ओम प्रकाश राजभर यांनीही आमच्याशी चर्चा केली. बरेच लोक त्यांच्यासोबत आहेत."

याशिवाय, संजय सिंह यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ जारी केला आहे. "सध्या मी आम आदमी पार्टीच्या कार्यालयात आहे. गेल्या काही दिवसांपासून मी सतत योगी सरकारविरूद्ध सत्य बोलण्याचे धाडस दाखवत आहे. त्यांच्याविरोधात सतत आवाज उठवत आहे, त्यामुळे त्यांनी घरमालकावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या पार्टीचे कार्यालय बंद केले," असे यामध्ये म्हटले आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशAAPआप