शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

देहूरोड परिसरात जकात नाके बंद

By admin | Updated: July 2, 2017 02:31 IST

केंद्र सरकारने एक जुलैपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी ) लागू करण्याचा निर्णय घेतल्याने संरक्षण विभागाच्या रक्षा संपदा महासंचालनालयाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कदेहूरोड : केंद्र सरकारने एक जुलैपासून वस्तू व सेवाकर (जीएसटी ) लागू करण्याचा निर्णय घेतल्याने संरक्षण विभागाच्या रक्षा संपदा महासंचालनालयाच्या कॅन्टोन्मेंट विभागाच्या एका पत्रानुसार शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या आदेशानुसार शुक्रवारी मध्यरात्री कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने सर्व जकात नाके बंद केले असून, मध्यरात्रीनंतर नाक्यावर होणारी जकात, पारगमन शुल्क व वाहनप्रवेश शुल्क वसुली बंद करण्यात आली आहे. मात्र, शनिवारी दुपारी जकात नाक्यावर पाहणी केली असता जकात नाक्यावर नियुक्त करण्यात आलेले सर्व कर्मचारी त्यांना कॅन्टोन्मेंट कार्यालयाकडून बदलीबाबत कोणताही आदेश प्राप्त न झाल्याने नाक्यावर बसलेले दिसून आले. संपूर्ण देशात वस्तू व सेवाकर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शनिवारपासून कॅन्टोन्मेन्ट बोर्डाकडून आकारण्यात येणारा जकात कर, पारगमन शुल्क व वाहन प्रवेश शुल्क बंद करण्याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्डाने कार्यवाही केली असून, बोर्डाच्या हद्दीतील पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील निगडी व शेलारवाडी तसेच कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गवरील शितळानगर (मामुर्डी), देहूगाव ते देहूरोड रस्त्यावरील झेंडेमळा तसेच देहूरोड रेल्वे स्थानकाजवळ असणारा जकात नाका असे सर्व पाचही जकात नाके बंद करण्यात आले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री जकात नाके बंद करून त्याठिकाणी जकात नाका बंद असल्याबाबत सूचना लावल्या होत्या. शनिवारी सकाळपासून जकात नाक्यांवरील महत्त्वाचे सामान व विविध वस्तू हलविण्याची तयारी सुरू झाल्याचे चित्र दिसून आले. दुपारी निगडी येथील जकात नाक्यावर प्रत्यक्ष पाहणी केली असता नाक्यावर बोर्डाचे जकात विभागातील कर्मचारी कामावर हजर होते. जकात, पारगमन शुल्क व वाहनप्रवेश शुल्क बंद झाल्याची माहिती नसल्याने काही वाहने थांबून कर भरण्यासाठी नाक्यावर येताच बाहेरच बसलेले कर्मचारी आजपासून ‘वसुली’ बंद झाल्याचे सांगत होते.