शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

झेब्रा क्रॉसिंग फक्त शोभेलाच!

By admin | Updated: March 24, 2017 04:08 IST

पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत झपाट्याने वाढली आहे. दररोज नवी वाहने रस्त्यावर दाखल होत आहेत. त्यामुळे वाहतुकीत मोठ्याप्रमाणावर वाढ

पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत झपाट्याने वाढली आहे. दररोज नवी वाहने रस्त्यावर दाखल होत आहेत. त्यामुळे वाहतुकीत मोठ्याप्रमाणावर वाढ होत आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा व त्यांच्या सोयी-सुविधांचा फारसा विचार होताना दिसत नाहीये. बहुतांश सिग्नलला वाहने झेब्रा क्रॉसिंगलाच उभी केली जात असल्याने पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यातही गजबजीच्या रस्त्यांवर तर नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात येते. वाहतूक पोलिसांकडून अनेकदा कारवाईचा बडगा उगारला जातो. मात्र, काही काळाने परिस्थिती ‘जैसे थे’च होते. पादचाऱ्यांना सुरक्षित रस्ता ओलांडता यावा, यासाठी लागणाऱ्या विशिष्ट सिग्नलची संख्या पुण्यात बोटावर मोजण्या इतकीच आहे. जास्त पादचारी संख्या असलेल्या रस्त्यांवर अशा प्रकारचे सिग्नल उभारण्यात येतात. निगडीतील पवळे उड्डाणपुलाजवळील सिग्नलला अनेकदा पोलीस कर्मचारी उभा असेल तरच वाहनचालक सिग्नलला थांबतात. त्यातही झेब्रा कॉसिंगच्या नियमाचे पालन करणाऱ्यांची संख्या कमीच असते. अशीच परिस्थीती इतर ठिकाणांची आहे. वाहनचालकांनी जरी झेब्रा क्रॉसिंगची शिस्त पाळणे अपेक्षित असले, तरी रस्ते व झेब्रा क्रॉसिंगची रचना निर्दोष असणे तितकेच गरजेचे आहे. शहरातील बहुतांश ठिकाणी या रचनेवर लक्ष देण्यात आलेले नाही. त्याचबरोबर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पुरेसा वेळही देण्यात येत नाही. रस्त्याच्या लांबीनुसार वेळ ठरवणे अपेक्षित असताना तसा वेळ दिला जात नाही. दहा मीटरचा रस्ता असल्यास किमान पंधरा सेकंद वेळ देणे अपेक्षित आहे. पादचाऱ्यांच्या सोयीसाठी सर्वप्रथम रस्त्याच्या रचनेतील दोष दूर करणे गरजेचे आहे. अनेकदा झेब्रा क्रॉसिंगचा पट्टा तिरपा मारला जातो, असे काही नागरिकांनी सांगितले. तर काही ठिकाणी जेथे हा पट्टा संपतो तेथे दुभाजक आलेला असतो. स्टॉपलाइन, सिग्नलचे खांब हेही निर्दोष असणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे दर तीन महिन्यांनी रंगवायला हवे. लोकांची मानसिकता बदलणे हा यातील सर्वांत मोठा भाग असला, तरी पादचाऱ्यांसाठी योग्य रचनेचा रस्ता तयार करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. (प्रतिनिधी)