कामशेत : येथील इंद्रायणी कॉलनीत राहणारे दिवाकर विजय भालेराव (वय २२) यांनी शनिवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास येथील इंद्रायणी कॉलनीतील मातृछाया बिल्ंिडगमध्ये भाड्याने राहणाऱ्या जान्हवी दिवाकर भालेराव या बाहेर गेल्या असता, त्यांचे पती दिवाकर भालेराव यांनी किचनमध्ये साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. जान्हवी घरी परतल्यानंतर दरवाजा वाजवला, तरी आतून प्रतिउत्तर न मिळाल्याने खिडकी उघडून पाहिले असता दिवाकर यांनी गळफास घेतल्याचे दिसले. रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. (वार्ताहर)
तरुणाची आत्महत्या
By admin | Updated: March 26, 2017 01:48 IST