शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाद्वारे भाईगिरी, शहरातील तरुण धोक्याच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:52 IST

हातात तलवार, कोयता, पिस्तूल अशी शस्त्र घेऊन भाईगिरी लूक दिसून येईल, अशी स्टायलिस्ट काढलेली छायाचित्र फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर शेअर करायची, त्याखाली चित्रपटातील एखादा डायलॉग टाकायचा अगदी मिसरूड न फुटलेली मुलेही स्वत:ला भाई समजू लागली असून, सोशल मीडियावर त्यांच्या भाईगिरीची क्रेझ वाढली आहे.

मोशी - हातात तलवार, कोयता, पिस्तूल अशी शस्त्र घेऊन भाईगिरी लूक दिसून येईल, अशी स्टायलिस्ट काढलेली छायाचित्र फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर शेअर करायची, त्याखाली चित्रपटातील एखादा डायलॉग टाकायचा अगदी मिसरूड न फुटलेली मुलेही स्वत:ला भाई समजू लागली असून, सोशल मीडियावर त्यांच्या भाईगिरीची क्रेझ वाढली आहे.पिंपरी, चिंचवड, भोसरी, इंद्रायणीनगर, मोशी, चºहोली, चिखली, भोसरी, कासारवाडी अशा भागांत तरुणाईच्या उंबरठ्यावरील मुलांच्या भाईगिरीचे दर्शन सोशल मीडियावर घडत आहे. अलीकडच्या काळात ‘आऊट डोअर’ फोटोग्राफीचा नवा ट्रेंड बाजारात सुरू झाला आहे. तरुणाईच्या उंबरठ्यावरील मुले गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी फेसबुकवर आपले अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. हातात कोयता, तलवार, बनावट पिस्तूल घेऊन ग्रुपची काढलेली छायाचित्र सोशल मीडियावर पाठवून ते एक प्रकारे त्यांनी तयार केलेल्या ग्रुपचे ब्रँडिंग करत आहेत. सोशल मीडियावर सुरू असतो लाईक, कमेंटचा खेळ...ज्याला जितक्या जास्त लाईक अन् कमेन्ट तितकी त्याची दहशत अधिक असा त्यासाठी त्यांच्याकडूनच तर्क काढला जातो. सोशल मीडियाच्या लाईक, कमेन्टसच्या या खेळातून त्यांच्यातील वर्चस्ववादाच्या स्पर्धेला सुरुवात होते. एकमेकाला आव्हान, प्रतिआव्हान दिले जाते.हातात आलेले स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाचा अतिरेकी वापर यामुळे तरुणाई धोक्याच्या उंबरठ्यावर असून, वेळीच उपाययोजना केल्या तर तरुणाईपुढील धोका टळू शकेल, असे नागरिकांचे मत आहे.भय : दहशतीसाठी होतेय वाहनांची तोडफोडफेसबुकवर ग्रुपचे अस्तित्व दाखवून दिल्यानंतर एखाद दुसऱ्या शुल्लक कारणावरून ते शाळा, महाविद्यालयाच्या आवारातच राडा करून त्यांची भाईगिरी प्रत्यक्ष कृतीत आणतात. पुढच्या टप्प्यावर शाळा, महाविद्यालयात दादागिरी करून ते स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणे, आपली दहशत पसरविणे हा त्यामागे उद्देश असतो. पुढील टप्प्यात मित्रमंडळींना बरोबर घेऊन रात्री अपरात्री भर रस्त्यात केक कापून ते वाढदिवस साजरा करतात. त्यानंतरच्या टप्प्यात राहात असलेल्या परिसरात नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड अशा गंभीर आणि समाज स्वास्थ्य बिघडविणाºया कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग असतो.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या