शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

कुस्ती स्पर्धा - टाळगाव चिखलीत रंगला आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 03:47 IST

येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथमहाराज उत्सव व हनुमान जन्मोत्सवाचे टाळगाव चिखली उत्सव कमिटीतर्फे उत्सवाचे आयोजन करण्यात आले. हनुमान जन्मोत्सव, तसेच काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावोगावच्या पैलवानांनी यात सहभागी होत स्पर्धेत रंगत आणली.

चिखली  - येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथमहाराज उत्सव व हनुमान जन्मोत्सवाचे टाळगाव चिखली उत्सव कमिटीतर्फे उत्सवाचे आयोजन करण्यात आले. हनुमान जन्मोत्सव, तसेच काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता करण्यात आली. उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावोगावच्या पैलवानांनी यात सहभागी होत स्पर्धेत रंगत आणली. रोमहर्षक लढतींमुळे कुस्तीचा आखाडा रंगला.उत्सवानिमित्त श्री भैरवनाथ महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. देवाला हारतुरे अर्पण करण्यात आले. घाटाचे पूजन करण्यात आले. गावातील शर्यतीच्या बैलांची नगारा, ताशा, डफ अशा पारंपरिक वाद्यांच्या तालात भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढण्यात आली. या वेळी गावातील सजवलेले शर्यतीचे शेकडो बैल मिरवणुकीत सहभागी झाले आले. ते पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. उत्सवानिमित्त टाळमंदिर येथे चक्री भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी जोतिबाच्या काठीची मिरवणूक काढण्यात आली; तसेच करमणुकीसाठी रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम रंगला.यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पंचक्रोशीच्या तालमीतील नामांकित पैलवानांनी सलामी दिली. आखाड्यात राष्ट्रीय महिला कुस्तीपटू तेजल सोनवणे हिचा सन्मान करण्यात आला. या वेळी प्रेक्षकांना डोळ्याचे पारणे फेडणाºया अटीतटीच्या लढती बघायला मिळाल्या. कुस्त्या बघण्यासाठी शौकिनांनी गर्दी केली होती. पंच म्हणून वस्ताद सदाशिव नेवाळे यांनी काम पाहिले.आमदार महेश लांडगे, नगरसेवक राहुल जाधव, दत्ता साने, कुंदन गायकवाड, संजय नेवाळे, साधना मळेकर, संगीता ताम्हाणे, स्वीनल म्हेत्रे, अंकुश मळेकर, प्रभाकर ताम्हाणे आदी या वेळी उपस्थित होते. टाळगाव चिखली उत्सव कमिटीतर्फे उत्सवाचे व आखाड्याचे आयोजन करण्यात आले. रात्री पारंपरिक पद्धतीने प्रकाश मोरे यांनी चावडीवर बिदागीचे वाटप केले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या