शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिका-यांच्या पदोन्नतीची चिंता, सत्ताधारी भाजपाने तहकूब केली सभा; वैद्यकीय अधिका-याच्या निवडीत रस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:04 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा सर्वसाधारण सभा तहकूब केली. विषय पत्रिकेवर आरक्षणे ताब्यात घेणे, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अभियानाविषयीचे महत्त्वाचे विषय असताना चर्चा न करताच केवळ वैद्यकीय अधिका-यांच्या अधिकारी नियुक्तीस उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश आल्याने सत्ताधा-यांनी सभा तहकूब केली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा सर्वसाधारण सभा तहकूब केली. विषय पत्रिकेवर आरक्षणे ताब्यात घेणे, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत अभियानाविषयीचे महत्त्वाचे विषय असताना चर्चा न करताच केवळ वैद्यकीय अधिका-यांच्या अधिकारी नियुक्तीस उच्च न्यायालयाने स्थगिती आदेश आल्याने सत्ताधा-यांनी सभा तहकूब केली. शहराचे प्रश्नांऐवजी सत्ताधा-यांना अधिका-यांच्या पदोन्नतीत रस असल्याची टीका होत आहे.गेली सहा महिने सलगपणे सर्वसाधारण सभेचे कामकाज चालविले. मात्र, सप्टेंबर महिन्याची सभा कोणतेही सबळ कारण नसताना महिनाभर तहकूब केली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. कार्यक्रमपत्रिकेवर सहा विषय होते. त्यात आरोग्य-वैद्यकीय अधिकारीपदावर डॉ. पवन साळवे यांची नियुक्ती करणे, दिघीतील आरक्षित जागांचे संपादन करणे आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वैयक्तिक घरगुती स्वच्छतागृह बांधण्याच्या कामाची माहिती देणे या तीनच प्रस्तावांचा समावेश होता. तर, महिला व बाल कल्याण समिती, शहर सुधारणा समिती आणि क्रीडा समित्यांचे सभावृत्तांत कायम करणे या सभाशाखेच्या तीन प्रस्तावांचा अंतर्भाव होता. दुपारी दोनला सभेला सुरुवात झाली. विलास मडिगेरी यांनी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार, महापौरांनी सभा महिनाभर पुढे ढकलल्याचे जाहीर केले.>महापालिकेच्या सभागृहात पैजाडॉ. साळवेची निवड करायची की रॉय यांना कायम ठेवायचे यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत आज पैजा लागल्या होत्या. सत्ताधारी हा विषय रेटून नेण्यासाठी तयारीनिशी उतरले होते. तर विरोधक त्यास विरोध करण्याच्या तयारीत होते. हा विषय आजच्या सभेत मंजूर होणार किंवा नाही याविषयीही पैजा लागलेल्या होत्या. मात्र, याविषयावर चर्चा झालीच नाही.सप्टेंबर महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवर महत्त्वाचे विषय नसल्याने या महिन्याची सभा तहकूब केली आहे.- नितीन काळजे, महापौर