शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याची मिटली चिंता

By admin | Updated: July 3, 2017 03:18 IST

पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात धुवाधार पाऊस पडत आहे. संततधार पवना धरण परिसरात गेल्या २४ तासांत ९८ मिमी पावसाची

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात धुवाधार पाऊस पडत आहे. संततधार पवना धरण परिसरात गेल्या २४ तासांत ९८ मिमी पावसाची  नोंद झाली आहे. पवना  धरणातील पाणीसाठा वाढल्याने दहा टक्के पाणीकपात प्रशासनाने मागे घेतली आहे. शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा होतो. मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतरही समाधानकारक पाऊस पडलेला नव्हता. पाणीसाठा २० टक्क्यावर गेल्याने महापौर नितीन काळजे यांनी दिवसाआड पाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, टँकर लॉबीसाठी कपात केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी पक्षांनी पाणीकपातीला विरोध केला होता. धरणात मुबलक पाणीसाठा असताना प्रशासनाने कपात लादली आहे, असा आरोप केला होता. त्यामुळे जनआंदोलन उसळू नये या भीतीने सत्ताधाऱ्यांनी समयसूचकता दाखवून जूनच्या पहिल्या आठवड्यात एक पाऊस झाल्यानंतर महापौरांनी दिवसाआड पाणीकपात मागे घेतली. नियमितपणे केवळ दहा टक्के पाणीकपात कायम ठेवली. त्यानंतर अनेक दिवस पाऊस पडला नाही. गेल्या आठवड्यात पावसास जोरदार सुरूवात झाली आहे. आठवडाभर सलगपणे पाऊस सुरू आहे. शनिवारी सकाळी सहा ते रविवारी पहाटे सहा या वेळेत ९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात सात दिवसांत १२.८८ टक्के वाढ झाली. धरणात सध्या तीन टीएमसी उपयुक्त पाणी आहे. मावळात जोरदार पाऊस सुरू असल्याने धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे पुणे-मुंबईतील पर्यटकांची वर्षाविहारासाठी गर्दी वाढू लागली आहे. मावळातील पवना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. पवना परिसराची एक जूनपासून आठशे मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एका महिन्यात पाणीसाठा ही १५ टक्क्यांनी वाढला आहे. ही वाढ समाधानकारक असून, याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही शहर परिसरातील दहा टक्के पाणीकपात रद्द केली असून, रविवारपासून नियमितपणे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. दहा टक्के पाणीकपात मागे घेतली आहे.