शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 00:29 IST

शहरात स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाहेर पडलेल्या महिलांसाठी सुरक्षित मुतारी व स्वच्छतागृहांची सुविधा नाही.

सुवर्णा नवले, पिंपरीशहरात स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बाहेर पडलेल्या महिलांसाठी सुरक्षित मुतारी व स्वच्छतागृहांची सुविधा नाही. युरिन नियंत्रित केल्यास मूत्रपिंड व इन्फेक्शनसारख्या आजारांना महिला बळी पडतात. सर्वसामान्य महिलांपासून ते कॉर्पोरेट आॅफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक महिलेला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. महिला घरातून किंवा आॅफिसमधून बाहेर पडल्यावर शहरातील प्रमुख रस्ते व चौकांत मुतारी व स्वच्छतागृहांची सोय नाही. याचा विपरीत परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत आहे. या सर्वांचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत आहे. महिलांना मूत्रपिंडासारखे आजार जडत आहेत. पोटदुखी होणे अशा आजारांना महिला बळी पडतात. महिला पोलिसांना असुविधा... महिला पोलीस, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्त्या, राजकारणी महिला सर्व महिलांचा यामध्ये समावेश आहे. याचा सर्वांत जास्त विपरीत परिणाम महिला पोलिसांच्या आरोग्यावर होत आहे. बंदोबस्तावेळी दिलेली ड्युटी किंवा बारा तास घराबाहेर करावी लागणारी नोकरी यामध्ये पोलीस महिलांची कुचंबणा होते. पोलीस चौकीच्या ठिकाणी स्वतंत्र महिला स्वच्छतागृह उपलब्ध नाहीत. त्या वेळी महिला पोलिसांना शेजारील सोसायटीमध्ये स्वच्छतागृह वापरण्यासाठी विनंती करावी लागते.मजूर महिलांची कोंडी...भाजीविक्रेत्या महिला, गवंडीकाम, तसेच इतर किरकोळ विक्रीव्यवसाय करणाऱ्या महिलांना अशा समस्या वारंवार उद्भवतात. सध्या वैयक्तिक शौचालयांमुळे ग्रामीण भागात स्वच्छतागृहे उभी राहिली. मात्र, आजही गोरगरीब व रोजगारासाठी शहरात आलेल्या महिलांची स्वच्छतागृहाअभावी कोंडी होते. त्यामुळे महिलांना उघड्यावर शौचालयाला जावे लागत आहे. बसस्थानकांवर महिलांची लूट...बसस्थानक तसेच रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशनची स्वच्छतागृहे ठेकेदारी पद्धतीवर चालवायला दिलेली असतात. अशा वेळी ठेकेदारांचे स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष असते. पे अँड युज तत्त्वावर ही स्वच्छतागृहे चालविण्यासाठी दिलेली असतात. मात्र, अशा स्वच्छतागृहांमध्येही महिलांकडून शौचालयाचा वापर करण्यासाठी बेकायदा पद्धतीने पैशांची लूट केली जाते. मुतारीचा वापर करण्यासाठी दोन रुपये व शौचालयाचा वापर करण्यासाठी पाच ते दहा रुपये आकारले जातात. मुतारीसाठी फक्त दोन रुपये शुल्क आहे. जादा पैसे आकारून महिलांची लूट केली. स्वच्छतागृहांची नियमावली सर्वांना माहीत नसल्याने पैसे भरून स्वच्छतागृहांचा वापर करण्यास महिला टाळाटाळ करतात. अशा स्वच्छतागृहांच्या समस्येत महिला अडकलेल्या आहेत.