शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

महिलेची तिसऱ्या मजल्यावरून उडी; पिंपळेगुरवमध्ये अवैध बांधकामाच्या कारवाईदरम्यानचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 14:41 IST

अतिक्रमण विरोधी पथक अनधिकृत बांधकामाविरूद्धची कारवाई करण्यासाठी पिंपळेगुरव येथे दाखल झाले. त्यांनी इमारतीतील साहित्य बाहेर काढण्यास सांगितले. त्यावेळी या इमारतीत राहणाऱ्या देवी राम पवार (वय ३०) या महिलेने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली.

ठळक मुद्देगंभीर जखमी झालेल्या या महिलेला तातडीने हलविण्यात आले रूग्णालयात महिलेला कोणीतरी ढकलुन दिले; महिलेच्या नातेवाईकांनी केला आरोप

पिंपरी : महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक अनधिकृत बांधकामाविरूद्धची कारवाई करण्यासाठी पिंपळेगुरव येथे दाखल झाले. त्यांनी इमारतीतील साहित्य बाहेर काढण्यास सांगितले. त्यावेळी या इमारतीत राहणाऱ्या देवी राम पवार (वय ३०) या महिलेने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. ही घटना मंगळवारी साडेबाराच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या या महिलेला तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले. खासगी रूग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनमुळे पिंपळेगुरव परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळेगुरव येथील देवकर पार्क येथे सकाळी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाईसाठी ताफयासह गेले. पोलीस बंदोबस्तात गेलेल्या या पथकाने घरमालकांना घरातील साहित्य बाहेर काढण्यास सांगितले. देवी पवार तसेच घरातील अन्य मंडळींनी कारवाई थांबविण्याबाबत पथकाला विनंती केली. मात्र त्यांचे काहीही ऐकुन न घेण्याच्या मनस्थितीतील अतिक्रमण विरोधी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कारवाई करावीच लागेल. असे सांगून या घरातील साहित्य बाहेर काढण्याच्या सुचना दिल्या. त्यानंतर देवी पवार पुढे आल्या. अतिक्रमण विरोधी पथकामार्फत कारवाई होत असल्याने तणावाखाली आलेल्या देवी पवार इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेल्या. तणावाच्या परिस्थितीत त्यांनी तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. गंभीर जखमी झालेल्या देवी यांना वाकड येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. या महिलेला कोणीतरी ढकलुन दिले, असा तिच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. सांगवी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. 

टॅग्स :pimpale guravपिंपळेगुरवpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड