शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

दरोड्यात वृद्ध महिला जखमी

By admin | Updated: June 2, 2017 02:25 IST

चऱ्होली, वडमुखवाडी येथे चोरट्यांनी घरात शिरून ९२ हजारांचे दागिने लंपास केले. यामध्ये ६६ वर्षीय वृद्ध महिलेच्या कानातील

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : चऱ्होली, वडमुखवाडी येथे चोरट्यांनी घरात शिरून ९२ हजारांचे दागिने लंपास केले. यामध्ये ६६ वर्षीय वृद्ध महिलेच्या कानातील दागिने चोरट्यांनी हिसकावून काढले. त्यामुळे त्यांच्या दोन्ही कानाच्या पाळ्या तुटल्या. ही घटना बुधवारी रात्री घडली. सुभद्रा जगन्नाथ तापकीर (वय ६६, रा. वडमुखवडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सुभद्रा यांचा मुलगा आणि नातू घराच्या छतावर झोपले होते. वृद्ध सुभद्रा या घरात झोपल्या होत्या. घरावर पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी या संधीचा गैरफायदा उठविला. चोरट्यांनी घरात शिरून आजीला क्लोरोफार्म लावले. क्लोरोफॉर्ममुळे आजीला गुंगी आली. आजीने आरडोओरडा केला नाही. घरातील कपाटात ठेवलेले दागिने चोरट्यांनी घेतले. सुमारे ९२ हजार किमतीचे साडेआठ तोळे सोने चोरले. त्याच वेळी आजीच्या कानात दिसून आलेली कर्णफुले चोरट्यांनी अक्षरश: ओढून काढली. कानातील दागिने हिसकावताना, आजीच्या दोन्ही कानांच्या पाळ्या फाटल्या. क्लोरोफॉर्ममुळे आजी गुंगीत असल्याने कानाला ईजा झाल्याची तिला जाणीव झाली नाही. सकाळी आजीच्या दोन्ही कानाच्या पाळ्या फाटल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिघी पोलीस अधिक तपास करत आहेत.