शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी-चिंचवडवर कुणाचा झेंडा फडकणार? महापालिका निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजणार

By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: May 7, 2025 16:57 IST

महायुती आणि महाआघाडी की सगळेच स्वबळावर लढणार?; शहरावरील वर्चस्वासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू

पिंपरी : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आता महापालिका निवडणुकांचे बिगूल लवकरच वाजणार आहेत. पिंपरी-चिंचवडवर कुणाचा झेंडा फडकणार, याची शहरात उत्सुकता असून, भाजपने मंडलाध्यक्षांच्या निवडी करून तयारीचे एक पाऊल पुढे टाकले आहे, तर इतर पक्षही पदाधिकारी निवडीवर भर देत आहेत. निवडणुकांसाठी महायुती आणि महाआघाडी होणार की सगळेच स्वबळावर लढणार, याकडे इच्छुकांचे लक्ष आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत भाजपने बाजी मारत सत्ता काबीज केली होती. त्यावेळी भाजपचे ७८ नगरसेवक निवडून आले होते, तर राष्ट्रवादीचे ३५, शिंदेसेनेचे नऊ, मनसेचा एक व पाच अपक्ष सदस्य होते. त्यावेळी १२८ जागांसाठी ७७४ उमेदवार रिंगणात होते. भाजपने राष्ट्रवादीला धूळ चारत एकहाती वर्चस्व मिळवले होते. त्यानंतरच्या २०१९च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे वगळता शहर आणि परिसरात महायुतीचेच खासदार व आमदार निवडून आले होते. २०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही तेच चित्र पाहायला मिळाले. त्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत मतदार कोणाला कौल देणार, हे चार महिन्यांत दिसणार आहे.

 सध्याचे पक्षीय बलाबल

पिंपरी-चिंचवड शहर मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागले आहे. मावळमध्ये शिंदेसेनेचे श्रीरंग बारणे, तर शिरूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे डॉ. अमोल कोल्हे खासदार आहेत. शहरात चिंचवड, पिंपरी आणि भोसरी असे तीन विधानसभा मतदारसंघ असून, दोन भाजपचे आणि एक अजित पवार गटाचे आमदार आहेत. शहरात विधान परिषदेचे दोन आमदार असून, दोघेही भाजपचेच आहेत. शहरात भाजपकडे चार आमदारांकडे, तर अजित पवार गटाकडे एका आमदाराचे बळ आहे. त्यावरून सध्यातरी कागदावर महायुतीचे आणि त्यातही भाजपाचेच वर्चस्व असल्याचे चित्र आहे. 

भाजप आणि राष्ट्रवादीचा स्वतंत्र लढण्यावर भरपिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट दोन्ही प्रबळ आहेत. मात्र, दोन्ही गटात ऐक्य नाही. महापालिका निवडणूक स्वबळावरच लढवली जाणार असल्याची चिन्हे आहेत. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले होते. ‘भाजप’चे शहराध्यक्ष आमदार शंकर जगताप यांनीही सर्व जागांवर भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले होते. महायुतीतील हे पक्ष स्वबळावर लढणार की स्वतंत्र लढणार, यावर विजयाचे गणित ठरणार आहे. चार सदस्यीय पद्धतीला राष्ट्रवादीचा विरोध

महापालिकेत २००२ पासून २०१७ पर्यंत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता होती. मात्र, २०१७ मध्ये भाजपने सत्ता ताब्यात घेतली. तत्कालीन फडणवीस सरकारने चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेतल्याने भाजप विजयी झाल्याचा मतप्रवाह आजही कायम आहे. मात्र, राष्ट्रवादीसह अन्य पक्षांचा चार सदस्यीय पद्धतीने निवडणूक घेण्यास विरोध होता.

टॅग्स :PuneपुणेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक 2024pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड