शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

येऊन येऊन येणार कोण?

By admin | Updated: February 20, 2017 03:01 IST

महापालिका निवडणुकीतील जाहीर प्रचारातील राजकीय नेत्यांच्या धडाडणाऱ्या भाषणांच्या तोफा आज सायंकाळी साडेपाचला

पिंपरी : महापालिका निवडणुकीतील जाहीर प्रचारातील राजकीय नेत्यांच्या धडाडणाऱ्या भाषणांच्या तोफा आज सायंकाळी साडेपाचला थंडावल्या. गेल्या दोन आठवड्यापासून भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी , शिवसेना, मनसे, एमआयएम आदी राजकीय पक्षांच्या आणि अपक्षांच्या जाहीर प्रचाराची सांगता झाली. रविवार सुटीचा दिवस असल्याने उमेदवारांनी रोडशो, सभा, कोपरा सभा, रॅलीवर भर दिला. ‘येऊन येऊन येणार कोण...’च्या घोषणांनी वातावरण ढवळून निघाले.महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान येत्या मंगळवारी (दि. २१) होत आहे. उमेदवारी माघारीनंतर महापालिकेतील ३२ प्रभागांसाठीच्या १२८ जागांसाठी सुमारे ७७३ उमेदवार रिंगणात होते. माघारीनंतर निवडणुकीच्या रणधुमाळीत रंग भरायला सुरुवात झाली होती. राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या सभा गाजल्या. या वर्षी राष्ट्रीय पातळीवरील स्टार प्रचारकांची संख्या अत्यल्प होती. राज्यातील आणि जिल्ह्यातील नेत्यांच्या सभांनी प्रचारात रंगत आणली.जाहीर प्रचाराचा रविवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारांनी मतदारसंवादावर भर दिला. सकाळपासून प्रभागांमध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांची फेरी काढली होती. पुढे पक्षाच्या उमेदवारांची माहिती देणारे भोंगे, त्यापाठोपाठ जिप्सीत उमेदवार, त्यापाठोपाठ शेकडो दुचाकी आणि चारचाकी गाड्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. चौकाचौकांत आणि सोसायट्या-सोसायट्यांमध्ये गेल्यानंतर फटाक्यांची जोरदार आतषबाजी, येऊन येऊन येणार कोण... या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. दिवसभर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, भाजपाचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे विविध भागात रोड शो व प्रचारफेरी झाली. प्रचार सांगतेची वेळ जवळ येऊ लागली, तसतसा रोड शोचा वेग वाढला. सायंकाळी साडेपाचपर्यंत रोड शो सुरू होते. तर भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आदी पक्षांच्या कोपरा सभाही झाल्या. (प्रतिनिधी)उमेदवारांनी घेतली खबरदारी३२ प्रभागांमध्ये पदयात्रा झाली. दोन किंवा तीन पक्षांच्या पदयात्रा समोरासमोर येऊन वाद निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेतली. त्या अनुषंगाने प्रभागातील पुतळा, देवाचे मंदिर किंवा मुख्य चौकापासून पदयात्रेला प्रारंभ झाला. रॅलीच्या सर्वात पुढे पॅनलमधील उमेदवार, त्या पाठोपाठ महिला कार्यकर्त्या आणि नंतर पुरुष कार्यकर्ते असे बहुतांश रॅलीचे स्वरूप होते. प्रभाग मोठे असल्यामुळे प्रमुख मार्गांचीच निवड करण्यात आली होती. पदयात्रेमधील तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. शिवजयंती आणि प्रचाराचा अंतिम दिवस एकच असल्यामुळे अनेक ठिकाणी ‘छत्रपती शिवाजीमहाराज की जय’च्या घोषणाही देण्यात आल्या. संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्याचा कार्यकर्त्यांनी निश्चय केला होता.जेवणावळींना ऊतप्रत्येक प्रभागात जेवणावळींना ऊत आला होता. एखादे मंगल कार्यालय किंवा मोठे मैदानाच्या ठिकाणी बेत आखला होता. या ठिकाणी शक्यतो शाकाहारी भोजन होते. मात्र, रात्री अनेक ठिकाणी सामिष बेत होता. अनेक ठिकाणी गोड-धोड पदार्थ आणि मिनरल वॉटरची सोय होती. शिवाय पदयात्रेत अल्पोपाहाराच्या पाकिटांचे वाटप केले. भोजनानंतर काही ठिकाणी आईस्क्रीम, थंड पेय यांची स्वतंत्र सोय होती.फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अपवर प्रचारप्रभागातील पॅनलमधील उमेदवारांनी एकत्रित पदयात्रा काढली. त्यामुळे अपक्ष आणि बंडखोरांची काहीशी अडचण झाली. परंतु, आयात कार्यकर्त्यांच्या बळावर अनेक अपक्षांनी पदयात्रेचे आयोजन केले होते. मिळालेले चिन्ह मतदारांपर्यंत पोचविण्यासाठी त्यांची दमछाक झाली. काही अपक्षांनी पदयात्रा न काढता चार-पाच कार्यकर्त्यांसह घरोघरी संपर्कावर भर दिला. तसेच फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अपवर प्रचार सुरू होता.