शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘पोस्टर बॉईज’ना आवरणार कोण? चर्चेत येण्यासाठी आटापीटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 01:51 IST

अल्पावधीत चर्चेत येण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून सध्या वाढदिवसाचे निमित्त साधून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केली जात असून, त्यावर खुन्नस देणारा व आक्षेपार्ह मजकूर पाहायला मिळतो.

पिंपरी : अल्पावधीत चर्चेत येण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून सध्या वाढदिवसाचे निमित्त साधून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केली जात असून, त्यावर खुन्नस देणारा व आक्षेपार्ह मजकूर पाहायला मिळतो. यातून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी एकप्रकारे दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचाच प्रयत्न केला जात आहे़ पिंपरी-चिंचवड शहरातील अशा प्रकारच्या ‘पोस्टर बॉईज’ना आवरणार कोण, असा पश्न उपस्थित होत आहे.वाहन परवाना नसतानाही ट्रीपल सीट वाहन चालवायचे, टोळक्याच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या आवारात रॅश ड्रायव्हिंग करायची यासह आता वाढदिवसाचे निमित्त साधून पोस्टर उभारण्यावरही अल्पवयीन मुलांचा अधिक कला आहे. या पोस्टरवर ज्याचा वाढदिवस आहे त्याचा फोटो तसेच खुन्नस देणारा मजकूर असतो. सराईत गुंडांचे फोटोही पोस्टरवर झळकत असतात. दरम्यान, अशा पोस्टरबाजीतून अनेकदा टोळक्या टोळक्यांमध्ये वादाच्या घटनाही घडतात.खुन्नस देणारी गाणी, डायलॉगएका टोळक्याचे दुसऱ्या टोळक्याशी वाद असल्यास एकमेकांना खुन्नस देण्याचे प्रकार घडतात. एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने साउंड लावलेले असल्यास त्यावर खुन्नस देणारी गाणी वाजविली जातात. आता तर खुन्नस देणारे अनेक ‘डायलॉग’ही आले आहेत. अशा ‘डायलॉग’चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.वाढदिवस भव्य स्वरुपात साजरा केला जातो. वेगवेगळ्या नावाने परिचित असलेल्या टोळक्यातील मुलांनी वाढदिवसाला उपस्थित राहावे, यासाठी जोरदार प्रयत्न केले जातात. यातून एकप्रकारे ताकत दाखविण्यासाठीची धडपड सुरु असते.पोलिसांचे दुर्लक्ष : नावापुढे अजब विशेषणेअल्पवयीन मुलांचे फोटो पोस्टरवर झळकत असताना, त्यांच्या नावासमोर अजब प्रकारची विशेषणे जोडलेली पाहायला मिळतात. डॉन, भाई, बादशहा, शेर अशा प्रकारच्या विशेषणांचा समावेश असतो. वाढदिवसानिमित्त टोळके जमा करून त्यांच्या माध्यमातून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला जातो. केक कापताना तलवारीचा वापर करणे, मध्यरात्रीच्या वेळी केक कापून गोंधळ घालणे, वाढदिवस असणाºया मुलाला सोबत घेऊन परिसरातून घोषणा देत फेरी काढणे, असे उद्योग केले जात आहेत.सोशल मीडियावरही उड्याखुन्नस देणारा, आक्षेपार्ह असलेला मजकूर फोटोसह तयार करून सोशल मीडियावर टाकला जातो. यास मोठ्या प्रमाणात लाईक, कमेंटसही मिळतात.पोस्टरवरील ‘बॉईज’ अल्पवयीन असल्याने त्यांच्या ओठांवर मिशाही फुटलेल्या नसतात. मात्र, पोस्टरवरील मजकुरातूनच दहशतीची भाषा केली जाते. सराईत गुंडांच्या नावांचा, टोपण नावांचा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या पोस्टरची जोरदार चर्चाही होते.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड