शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सव्वाशे एकराची सुपारी कोणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2016 01:39 IST

पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढीव हद्दीच्या मंजूर विकास आराखड्यातील लाल पूररेषेच्या बाहेरील ना विकास वापरात असलेले क्षेत्र सलग रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याचा विषय

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढीव हद्दीच्या मंजूर विकास आराखड्यातील लाल पूररेषेच्या बाहेरील ना विकास वापरात असलेले क्षेत्र सलग रहिवासी क्षेत्रात समाविष्ट करण्याचा विषय सोमवारच्या सर्वसाधारण सभेत गाजला. हा विषय सभेपुढे व्यवस्थित न मांडल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. १२५ एकर क्षेत्र रहिवासी करण्यासाठी कोण प्रयत्नशील आहे, यासाठी सुपारी देणारा कोण, असा आरोपही सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर केला. विषय संदिग्ध असल्याने अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांत जुंपली. गोंधळ असल्याने हा विषय मागे घेऊन सभेपुढे नव्याने सादर करावा, असा आदेश महापौरांनी दिला. तहकूब सभा १० फेब्रुवारीला होणार आहे.यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वसाधारण सभेत शासन प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. मंजूर विकास आराखड्यातील लाल पूररेषेच्या बाहेरील ना विकास वापर विभागात दर्शविलेले क्षेत्र सलग रहिवासी क्षेत्राची उपलब्धता होण्यासाठी व सुनियोजित विकास होण्यासाठी रहिवास विभागात समावेशासाठी महापालिकेने कलम ३७ चा प्रस्ताव कार्यान्वित करून शासनास सादर करावा, असे निर्देश पालिकेस दिले होते. त्यानुसार हा विषय मंजुरीसाठी ठेवला होता. १८ जुलैला आलेल्या शासनादेशानुसार २० नोव्हेंबरच्या सभेपुढे हा विषय मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, त्यावर चर्चा झाली नाही. आजच्या सभेपुढे हा विषय आला. मुद्द्यांवर चर्चा झाली. राजेंद्र जगताप म्हणाले, ‘‘हा विषय काय आहे, याचा सविस्तर खुलासा करावा. या प्रस्तावात नवीन गावांतील नदीकाठच्या क्षेत्राचा विचार केला आहे. जुन्या गावांचा विचार होणार का, याबाबत उपसूचना घ्यावी.’’सुरेश म्हेत्रे म्हणाले, ‘‘समाविष्ट गावांत नदीकाठच्या भागात मोठ्या प्रमाणावर हरित पट्टा आहे. या नवीन दुरुस्तीने नव्या आणि जुन्या गावांचाही विचार केला जावा.’’ ‘‘विकास आराखड्यात चुका झाल्या. त्यातील पूररेषा ही चूक आहे. मंजुरी देताना विचार व्हायला हवा. जुन्या-नवीन गावांचा विचार व्हावा,’’ असे दत्ता साने म्हणाले. संजय काटे, स्वाती कलाटे यांनीही उपसूचना दिली. योगेश बहल म्हणाले, ‘‘विषयाबाबत संदिग्धता आहे. या विषयाचा पूर्ण खुलासा करावा. नाला, सर्व्हे क्रमांक यामुळे गुंतागुंत वाढली आहे.’’ नितीन काळजे, नाना लोंढे, राहुल जाधव यांनीही चर्चेत सहभाग घेतला. (प्रतिनिधी)