शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
5
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
6
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
7
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
8
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
9
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
10
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
14
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
15
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
16
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
17
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
18
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर

वन्य प्राण्यांचा वाढला मानवी वस्तीमध्ये वावर, याला नेमके जबाबदार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 02:53 IST

मावळ तालुक्यातील दुर्गम भाग : वाढत्या शहरीकरण आणि वृक्षतोडीमुळे परिसरातील डोंगर झाले ओस

चंद्रकांत लोळे

कामशेत : मावळ तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये वन विभागाचे मोठे कार्यक्षेत्र आहे. येथे मोठ मोठी जंगले आहेत. या जंगलात वन्य प्राण्यांचे मुख्य निवासस्थान आहे. परंतु वाढत्या शहरीकरण, मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, हळूहळू ओसाड होणारे डोंगर, वाढत्या शिकारी, जंगलातील नागरिकांचा वाढता वावर आदी प्रमुख कारणांसह जंगलातील संपत चाललेले पाण्याचे स्रोत, जंगलातील धोक्यात येत असलेला प्राण्यांचा निवारा आदी कारणांमुळे जंगलातील वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊ लागल्याच्या घटनांमध्ये काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे.स्थानिक नागरिक, पाळीव प्राणी, शेती आदींना धोका निर्माण होऊ लागला असल्याने याला नक्की जबाबदार कोण असा प्रश्न पर्यावरण प्रेमी व प्राणी मित्र संघटना उपस्थित करत आहे. मावळ तालुक्यातील नाणे, पवन, आंदर मावळामध्ये मोठी धरणे असून, नाणे मावळात शिरोता व वडिवळे, पवन मावळात पवना, आंदर मावळात आंद्रा आदी धरणे व छोटे मोठे तलाव, नद्या व इतर जलाशय आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात वनराई व दाट जंगले आहेत. या भागांमध्ये अनेक लहान मोठी गावे वाड्या वस्त्या असून, येथे वास्तव्य करणाऱ्या सर्वांचाच उदरनिर्वाह हा शेती व शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहे. बेसुमार उत्खनन आदींमुळे मावळातील अनेक डोंगर टेकड्या नामशेष होत आहेत. नैसर्गिक कारणांबरोबरच मानवनिर्मित कृत्रिम कारणांमुळे वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. जनावरांना रानात चरावयास सोडणे धोकादायक झाले असून, अनेक गावांतील नागरिकही रात्री उशिरा बाहेर पडण्यास घाबरत आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी बिबट्याने नाणे मावळातील भाजगाव येथे दोन शेळ्या, साई येथे वासरू व इतर पाच पाळीव प्राणी व इतर अनेक प्राण्यांचा फडशा पडला होता. तर ताजे गावाच्या जवळ एका आश्रमात कुत्र्यावर हल्ला तसेच उंबरवाडी येथील डोंगर पठारावरील धनगर वस्तीजवळ बिबट्याचा वावर वाढला होता. याशिवाय अन्य वन्यप्राणी शेतीचे मोठे नुकसान करत आहेत.टाकवे खुर्द गावाच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या (नर मादी व दोन बछाड्यांचा) वावर आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराहटीचे वातावरण आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक हे रात्रीच्या वेळी बाहेर पडत नाहीत. आपल्या जनावरांची विशेष काळजी घेत आहेत. त्यात या भागात मेंढपाळाचा मुकाम असतानारात्रीच्या वेळी बिबट्याने एका घोड्याचा फडशा पाडला.हा घोड्याला पुन्हा खाण्यासाठीयेईल म्हणून वन्यजीव रक्षक अनिल आंद्रे व त्यांच्या सहकाºयांनी दोन दिवस येथे खडा पहारा दिला.मात्र त्यांना बिबट्या सापडला नाही; पण वन्य प्राण्यांची शिकारी करणारे अनेक जण भेटले. या भागातील उंबरवाडी येथील डोंगरावर बिबट्याचा वावर असल्याचे या आधीही प्रकर्षाने समोर आले आहे.शिकारीच्या प्रकारात वाढ४दुर्गम भागातील ठरावीक गावांमध्ये शासनाने संरक्षणासाठी बंदुकीचे परवाने दिले आहेत. त्याचा विधायक कामांसाठी उपयोग न करता शिकारी करणे, पाहुणे मंडळींना व व्यावसायिक शिकारी करणाºया लोकांना बोलावून रानात शिरून शिकार करून पार्ट्या करणे, वन्य प्राण्यांच्या मांसाची विक्री करणे आदी प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.या भागात सध्या बिबट्याचा वावर आहे. मात्र तो जंगलात आहे गावांमध्ये नाही. शिवाय या बिबट्याने मानवी वस्ती अथवा माणसावर हल्ला केला नाही. या भागातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराच्या बाहेर झोपू नये, रात्रीच्या वेळी एकट्याने रस्त्यावर ये-जा करू नये. तसेच आपल्या भागात बिबट्या दिसल्यास फटाके वाजवावेत व वन विभागाला याची माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. संजय मारणे, वन क्षेत्रपालमावळात मोठ्या प्रमाणात वन्य जीवांची हत्या शिकारी करत आहेत. हिंस्र प्राण्यांना अन्नाचा तुटवडा होत आहे. बेसुमार वृक्षतोड शिवाय पाण्याचे स्त्रोत संपुष्टात येत असल्याने व मानवाचे जंगलात वास्तव्य वाढल्याने वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढत आहे. वन्य प्राण्यांच्या शिकारीवर निर्बंध आणणे गरजेचे आहे. वन विभागाने स्थानिक लोकांमध्ये जनजागृती करून डोंगर पठार आदी ठिकाणी जलस्रोत, वृक्षसंवर्धन व लागवड यावर भर देणे गरजेचे आहे.- अनिल आंद्रे, वन्यजीव रक्षकसुमारे पंधरा दिवसांपूर्वी वन विभागाने ग्रामपंचायत व स्थानिकांना सूचना केल्या आहेत. वन विभाग हा परिसरातील गावांमध्ये रात्रीच्या वेळी एकटे फिरू नका, लहान मुलांना बाहेर सोडू नका, घराबाहेर झोपू नका आदी सूचनांचे पत्र दिले असून, यासंबंधी ग्रामस्थांना कळवले आहे. वनविभागाकडून ग्रामपंचायतीला सूचना आल्या आहेत. त्यानुसार ग्रामस्थांना माहिती दिली आहे.- वैदेही रणदिवे, सरपंचखांडशी ग्रुप ग्रामपंचायत 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड