शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

तीन आसनी रिक्षा गेल्या कुणीकडे?

By admin | Updated: February 13, 2017 01:36 IST

महापालिका निवडणूक प्रचारासाठी अवघे सात दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पीएमपी बसस्थानकाला तीन आसनी

निगडी : महापालिका निवडणूक प्रचारासाठी अवघे सात दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडाला आहे. पीएमपी बसस्थानकाला तीन आसनी रिक्षांचा गराडा असतो. परंतु या तीन आसनी रिक्षा प्रचारयंत्रणेच्या रणधुमाळीमध्ये व्यस्त असल्याने बसस्थानकावर व पवळे उड्डाणपूल या ठिकाणी रिक्षांनी गजबजलेले ठिकाण मात्र मोकळे दिसत आहे. यामुळे या ठिकाणी असणाऱ्या रिक्षा नेमक्या गेल्या कुठे, असा प्रश्न या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडत आहे. भौगोलिकदृष्ट्या प्रभागरचनेत मोठे बदल झाल्याने उमेदवारांसाठी प्रभाग मोठा बनला आहे. साहजिकच प्रचारासाठी लागणाऱ्या वाहनांतही वाढ झाली आहे. उमेदवाराचे नाव व त्याला मिळालेले अधिकृत चिन्ह मतदारापर्पंत पोहचविण्यासाठी तीन आसनी रिक्षांची व मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा वापर प्रचारासाठी वाढला आहे. तीन आसनी वाहने एरवी चौकाचौकांत प्रवाशांची वाट पाहत असतात. परंतु सध्या महापालिका निवडणूक प्रचारात तीन आसनी रिक्षा गुंतल्याने प्रवाशांनाच रिक्षाची वाट पाहावी लागत आहे. मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांचा पथनाट्य व पोवाड्याद्वारे प्रचार करण्यासाठी वापर प्रचारासाठी अवघे आठ दिवस उरले आहेत. आपल्या पॅनलचा व निवडणूक चिन्हाचा प्रचार करण्यासाठी व प्रभागाचे नेतृत्व करण्यासाठी आपणच कसे योग्य आहोत, हे सिद्ध करण्यासाठी व मतदारांना आकर्षित करण्यासाठी मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांचा वापर पथनाट्य, पोवाड्याद्वारे प्रचार करण्यासाठी अशा वाहनांचा वापर होत आहे.तसेच शहरातील अनेक उमेदवारांनी तीन आसनी रिक्षा बुक करुन ठेवल्या आहेत. या रिक्षांना दिवसभर प्रचाराचे साहित्य पोहोचविणे, कार्यकर्त्यांची ने-आण करणे यासारखी कामे दिली आहेत. (वार्ताहर)