शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दंड वसूल करणारे नेमके कोण?

By admin | Updated: September 6, 2015 03:30 IST

एखाद्याने नियमाचे उल्लघंन केले, तर ते वाहन वाहतूक पोलीस वाहतूक विभागात घेऊन जातात किंवा त्याच ठिकाणी दंडाची पावती फाडतात. मात्र रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात सांगवी

- शिवप्रसाद डांगे , रहाटणीएखाद्याने नियमाचे उल्लघंन केले, तर ते वाहन वाहतूक पोलीस वाहतूक विभागात घेऊन जातात किंवा त्याच ठिकाणी दंडाची पावती फाडतात. मात्र रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात सांगवी वाहतूक विभागाचा अजब कारभार सुरू आहे. वाहन उचलून ते वाहतूक विभागात घेऊन न जाता सर्व वाहने साई चौकात बीआरटीएस रस्त्यात उतरविण्यात येतात. संबंधित वाहनचालकाकडून काही तरुणांकडून मनाप्रमाणे रक्कम वसूल केली जात आहे. मात्र, दंड वसूल करणारे हे तरुण नेमके कोण आहेत, हे कोणालाच माहिती नाही. वाहनचालकांकडून राजरोसपणे दंड वसूल केला जात आहे. वाहतूक विभागाशी कोणताही संबंध नसणाऱ्या व्यक्ती दंडवसुली, कागदपत्रे तपासणे, परवाना तपासणे आदी कामे करीत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित विभागाकडून याला लगाम घातला जाईल काय, हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. स्थानिकांच्या मागणीनुसार शिवार चौक, कोकणे चौक, साई चौक व कुणाल आयकॉन रस्त्यावर सम व विषम तारखेला पार्किंगचे फलक लावण्यात आले. हा परिसर सांगवी वाहतूक विभागाच्या आधिपत्याखाली येतो. त्यामुळे या विभागाचे एक पोलीस वाहन, गाड्या उचलण्यासाठी पाच ते सहा मुले व एक टेम्पो नेमण्यात आले. वाहन उचलताना चालक हजर नसेल, तर ते वाहन टेम्पोत टाकून जवळच्या साई चौकात नेले जाते. ती वाहने येथे हवाली केली जातात. आपले वाहन जागेवर नाही, हे लक्षात येताच वाहनचालक वाहन शोधतात. मात्र, वाहन मिळून येत नाही. नंतर कळते की, वाहन पोलिसांनी नेले आहे. साई चौकात बीआरटीएस रस्त्यात ठेवले आहे. तेथे गेल्यावर गाडीची चौकशी कोणाकडे करायची, विचार करण्याच्या आत काय पाहिजे, गाडी नंबर काय, अशी विचारणा येथील काही तरुणांकडून केली जाते. लगेच कागदपत्रांची मागणी केली जाते. तातडीने त्यांच्याकडून किती दंड होईल, याची माहिती देण्यात येते. दंडाची रक्कम सांगताच वाहनचालकाच्या पायाखालची जमीनच सरकते. हे सर्व सुरू असताना दुसऱ्या तरुणाकडून तडजोड करण्यासाठी विचारणा केली जाते. १०० पासून ते २ हजारापर्यंत मागणी केली जाते. एखादा वाहनचालक चढ्या आवाजात बोलला, तर एक रुपयाही न घेता त्याला सोडून देण्यात येते. कोणी गयावया केली, तर त्याच्याकडून हजारो रुपये उकळले जात आहेत. काही दिवसांपासून सांगवी वाहतूक विभागाने शिवार चौक परिसरात ‘नो पार्किंग’मधील वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, दंडाची पावती न देता काही तरुण दंडवसुली करीत आहे. त्या तरुणांनी मला सर्व कागदपत्रे असताना एक हजार दंड सांगितला होता. कसेबसे ५०० रुपये देऊन सुटका करून घेतली. नको ती भानगड म्हणून मी याकडे दुर्लक्ष केले; परंतु दिवसेंदिवस हा प्रकार वाढतच आहे. ही सर्व मांडवली साई चौकातच होते. - अविनाश गायकवाड, एक वाहनचालक