शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रांग इथली संपणार कधी?

By admin | Updated: December 22, 2016 02:06 IST

नोटाबंदीच्या निर्णयाला ४० दिवस उलटून गेले, तरी बँक आणि एटीएमसमोरील रांंगा अद्याप कायम असल्याचे चित्र शहरात पाहायला

पिंपरी : नोटाबंदीच्या निर्णयाला ४० दिवस उलटून गेले, तरी बँक आणि एटीएमसमोरील रांंगा अद्याप कायम असल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. बहुतांश बँकांची एटीएम कें द्र अपुुऱ्या नोटांमुळे बंदावस्थेतच आहेत. बाजारात खेळते चलन नसल्याने रोखीने व्यवहार करण्यावर आपोआप बंधने आली आहेत. त्यामुळे नागरिकांकडून कॅशलेस व्यवहारावर भर दिल्याचे दिसत आहे. नोटाबंदीच्या निर्णयावेळी ५० दिवसांमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा दावा पंतप्रधानांनी केला होता. मात्र, ४० दिवसांनंतरही नवीन चलनी नोटांचा तुटवडा असल्याने परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. शहरातील बहुतांश एटीएम बंदच असल्याने नागरिकांनी बँक ांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, रिझर्व बँकेकडून पुरविण्यात येणाऱ्या नोटांची संख्या अपुरी असल्याने ग्राहकांना अपेक्षित रक्कम देण्यावर मर्यादा येत असल्याचे बँक प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. या सर्व गोंधळामध्ये चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. दैनंदिन खर्चासाठी पैसे काढायचे असतील, तर सकाळी आठपासूनच रांगेत उभे राहावे लागत आहे. जेणेकरून कामाला दांडी होणार नाही. मात्र बँका सुरू होण्याची वेळ साडेनऊची असते. प्रत्यक्षात मात्र व्यवहार सुरू होण्यासाठी अकरा वाजतात. त्यामुळे नोकरदार वर्गाला त्या दिवशी सुटीच घ्यावी लागत आहे. त्यामुळे बँक प्रशासनाच्या विरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. गृहिणींंना स्वयंपाकघरातील बजेट सावरताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. मात्र, खरेदी करण्यासाठी लागणारी रक्कम बँकेमधून काढताना नाकीनऊ येत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, लग्नखरेदीच्या उत्साहावर विरजण पडले आहे. आयटी अभियंते झाले खूषवाकड : नोटाबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस व्यवहार करण्याची सवय नसलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या उलट कॅशलेस व्यवहार करणारे आयटी अभियंते मात्र खूष आहेत. हिंजवडी परिसराचे रूप आयटी कंपन्यांमुळे पालटले आहे. येथील अभियंते मोठ्या प्रमाणात कॅशलेस व्यवहारच करत होते. नोटाबंदीच्या निर्णयानंतर या व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परंतु परिसरातील ग्रामीण भागातील नागरिक नाराज आहेत. अनेकांकडे बँक खातेही नाही. त्यामुळे त्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिसरातील बँकांभोवती पैसे काढण्यासाठी नागरिक सकाळपासून गर्दी करीत आहेत. (वार्ताहर)