शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

मावळ परिसरात कुत्री येतात कोठून? नागरिकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 03:04 IST

मावळ तालुक्यासह तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा आदी महत्त्वाच्या शहरातील अनेक भागांमध्ये, आजूबाजूला वसलेल्या महत्त्वाच्या गावांमध्ये तसेच मुख्य रस्ता व जुना मुंबई-पुणे महामार्गावर भटक्या व मोकाट कुत्र्यांचा वावर जास्त असला, तरी त्याच बरोबर मावळातील अनेक दुर्गम भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सकाळी भर रस्त्यावर अचानक २५ ते ३० कुत्र्यांचे टोळके दिसत आहे.

कामशेत - मावळ तालुक्यासह तळेगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा आदी महत्त्वाच्या शहरातील अनेक भागांमध्ये, आजूबाजूला वसलेल्या महत्त्वाच्या गावांमध्ये तसेच मुख्य रस्ता व जुना मुंबई-पुणे महामार्गावर भटक्या व मोकाट कुत्र्यांचा वावर जास्त असला, तरी त्याच बरोबर मावळातील अनेक दुर्गम भागांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सकाळी भर रस्त्यावर अचानक २५ ते ३० कुत्र्यांचे टोळके दिसत आहे.तालुक्यातील सर्वच भागात सकाळी सकाळी नोकरदार वर्ग विद्यार्थी व दुग्ध व्यावसायिक हे लगबगीत असतात. कामावर तसेच शाळेत विद्यालयात जाण्याच्या गडबडीत असताना भर रस्त्यात अचानक अवतरणाऱ्या अज्ञात व वाहनाच्या मागे धावणाºया मोकाट कुत्र्यांमुळे दुचाकीस्वारांना विशेष करून त्रास होत असून, यातून किरकोळ अपघात ही घडत आहेत. आपापल्या गावांमध्ये किती मोकाट कुत्री आहेत, याचा पुरेसा अंदाज शहरातील नागरिकांसह विविध गावातील गावकºयांना असताना त्या कुत्र्यांच्या व्यतिरिक्त हे वाढीव कुत्री येतात कोठून यावर सध्या परिसरात चर्चा सुरू आहे. कामशेत ग्रामपंचायत सरपंच सारिका घोलप यांना छत्रपती नेटवर्क मावळ या युवकांच्या संघटनेने कामशेतमध्ये असणाºया मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशा आशयाचे निवेदन दिले आहे.मावळातील शहर व गावागावांमध्ये मुख्य रस्त्यावर रोज सकाळी मोठ्या प्रमाणात अनोळखी कुत्र्यांची टोळी आढळून येत असून, या कुत्र्यांना येथे कोणी सोडले असा प्रश्न नागरिक आपापसात विचारात आहेत. मोठ्या शहरांमधून पकडलेली मोकाट कुत्री मावळातील अनेक खेडेगावांमध्ये रात्री अथवा पहाटेच्या सुमारास सोडली जात असल्याचा आरोप खेडेगावातील नागरिक करीत आहेत. या मोकाट जनावरांमुळे ग्रामीण जनजीवन विस्कळीत होत आहे. शहरातील कुत्री अशाप्रकारे ग्रामीण भागांमध्ये मोठ्या संख्येने सोडून येथील शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवन धोक्यात येत असून मुख्य रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या शिवाय नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होत असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.पशुधन विकास अधिकारी प्रभारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी ३ कामशेत मावळ डॉ. रूपाली दडके एखादा कुत्रा चावल्यास जखम ताबोडतोब पाण्याने स्वच्छ धुवायची, कोणतीही पट्टी न बांधता अथवा टाके न घालता २४ तासांच्या आत श्वानदंशाची लस घ्यावी. यात पहिली लस चावल्यानंतर लगेच दुसरी लस तिसºया दिवशी व त्यानंतर सातव्या दिवशी तिसरी लस घेणे गरजेचे आहे. याच बरोबर आपल्याकडे असणाºया पाळीव कुत्र्यांना ही श्वानदंशाची लस टोचून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.मावळ तालुक्यात मोकाट कुत्रे हा प्रश्न गंभीर असून यासाठी तालुक्यातील ग्रामपंचायतींना पत्राद्वारे या मोकाट जनावरांवर कारवाई करण्याच्या सूचना लवकरच देण्यात येतील, असे मावळचे प्रभारी गट विकास अधिकारी अप्पासाहेब गुजर यांनी सांगितले.तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये पिसाळलेली व मोकाट कुत्री इतर जनावरे यांच्यावर प्रतिबंध करण्यासाठी, त्यांना पकडण्यासाठी व या जनावरांवर रोख ठेवण्यास ग्रामपंचायत प्रशासनाकडे अशी यंत्रणा नाही. याची शासनाने दखल घेऊन प्रशासनाने तशी तरतूद करावी. या मोकाट व पिसाळलेल्या जनावरांवर कारवाई अथवा बंदोबस्त करण्यासाठी शासनाने यंत्रणा राबवावी व स्थानिक नागरिकांना होणारा त्रास त्यांनी दूर करावा, अशी मागणी सर्वच स्तरावरून होत आहे. अन्यथा लहान मुलांसह मावळवासीयांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :dogकुत्राpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड