शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वाहने धडकण्याचे प्रकार थांबणार कधी?

By admin | Updated: May 7, 2015 05:03 IST

नाशिक फाटा आणि भक्ती-शक्तीच्या जवळ मोठे बॅनर लावून मोठ्या वाहनांनी ग्रेडसेपरेटरमधून जाऊ नये, अशा सूचना लावण्याची गरज आहे.

पिंपरी : विनाअडथळा सुरक्षित आणि जलद वाहतुकीसाठी पुणे-मुंबई ग्रेडसेपरेटर मार्ग आहे. तिथून ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीची वाहने जाऊ नये, म्हणून नाशिक फाटा येथे उंचीमापक कमान लावण्यात आले होते. मात्र, रविवारी कंटेनर धडकल्यामुळे ते मोडून पडले आहेत. त्यासाठी उभे केलेले खांब वाकले आहेत, तर त्याचा बेसमेंटही उखडला गेला आहे. नाशिक फाटा आणि भक्ती-शक्तीच्या जवळ मोठे बॅनर लावून मोठ्या वाहनांनी ग्रेडसेपरेटरमधून जाऊ नये, अशा सूचना लावण्याची गरज आहे. महापालिका प्रशासन एका ठिकाणी उंचीमापक कमान उभी करून काम झाले, असे समजत असल्याने हे अपघात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कंटेनरची धडक इतकी मोठी होती की, उंचीमापक कमान लोखंडी असतानासुद्धा ते पूर्णपणे वाकले आहे. ग्रेडसेपरेटरमध्ये अनेक वेळा वाहने अडकली आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होण्याच्या घटना नियमित घडत असतात. त्यातच चौकाच्या स्लॅबला अनेक वाहने धडकू न त्यामध्ये स्लॅबचे नुकसान झाले आहे. या घटना कमी होण्यासाठी महापालिकेच्या वतीने खराळवाडी येथे उंचीमापक कमान लावले होते. ते कंटेनरच्या धडकेत तुटले होते. त्यामुळे वाहने प्रवेश करतात, तेथेच उंचीमापक कमान लावण्यात आले. मात्र, हेदेखील १५ दिवसांतच तुटलले आहे. हे लावण्यासाठी पालिकेला सात वर्षे लागली. कंटेनरच्या धडकेत उंचीमापक कमान मोडून पडले. मात्र, त्याचबरोबर त्याचा बेसमेंटसुद्धा उखडला आहे. त्यामुळे कामाचा दर्जाही चांगला असला पाहिजे.गे्रडसेपरेटचे काम होऊन आठ वर्षे झाली आहेत. तेव्हापासून आतापर्यंत अनेक वेळा कंटेनर अडकण्याच्या घटना घडल्या आहेत. या कंटेनरमुळे ग्रेडसेपरेटरच्या स्लॅबचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात नियमित कंटेनर अडकल्यामुळे स्लॅबचा बाग तुटून पडला होता. हजारो कोटी रुपये खर्च करून बनवलेल्या या रस्त्याचे ना पालिकेला ना पोलिसांना काही घेणेदेणे आहे. सात वर्षांनंतर लावलेले उंचीमापक कमान तकलादू असल्याने ते लगेच तुटून पडत आहेत. मोठ्या वाहनांना शहरातून बंदी घातली पाहिजे किंवा त्यांच्यावर पोलिसांनी नियंत्रण तरी ठेवले पाहिजे. या वाहनांवर नियंत्रण नसल्यामुळे कशाही पद्धतीने गाड्या चालवल्या जात आहेत. (प्रतिनिधी)