लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : चिखली कुदळवाडी परिसरात रस्त्यावर अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. ही अतिक्रमणे काढण्यास महापालिकेचे अधिकारी फिरकत देखील नाहीत. अनधिकृत गोदामांनी रस्त्याचे दोन्ही भाग व्यापले आहेत. मात्र, प्रशासन बेफिकीर आहे. या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोलीस अथवा पालिका प्रशासन का धजावत नाही? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे. या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात भंगार मालाची दुकाने उभारण्यात आली आहे. या दुकानांमुळे अनेकवेळा आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या भागातील अनधिकृत गोदामे हटवावीत अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. या रस्त्यावरील गोदामे हटविण्याचे काम अद्यापही करण्यात आले नाही. त्यामुळे या भागातील गोडाऊनची संख्या वाढतच चालली आहे.
बेकायदा गोदामांवर कारवाई कधी ?
By admin | Updated: May 11, 2017 04:37 IST