शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बेबडोहोळ पूल पूर्ण होणार तरी केव्हा?

By admin | Updated: June 30, 2017 03:41 IST

गेली सहा वर्षापासून सुरू असलेल्या बेबडोहोळ येथील पुलाचे अद्याप काम पूर्ण न झाल्याने याचा ताण जुन्या पुलावर येत असल्याने

लोकमत न्यूज नेटवर्कउर्से : गेली सहा वर्षापासून सुरू असलेल्या बेबडोहोळ येथील पुलाचे अद्याप काम पूर्ण न झाल्याने याचा ताण जुन्या पुलावर येत असल्याने हा ४० वर्षांपूर्वीचा साकव पूल व थुगाव येथील साकव पूल केव्हाही ढासळू शकतो. या जुन्या साकव पुलांचा प्रश्न समोर आल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनी याची धास्ती घेतली आहे. या दोन्ही साकव पुलांच्या मोऱ्या जीर्ण झाल्या आहेत. कासवाच्या गतीने सुरू असलेल्या बेबडोहोळ-परंदवडी पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे यासाठी दर वर्षी मागणी करण्यात येते. येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी तरी हा पूल वाहतुकीसाठी चालू करावा, अशी मागणी पंचक्रोशीतील गावकरी करतात. सन २००८-०९ मध्ये मुसळधार पावसामुळे बेबडोहोळ साकव पुलाची नऊ नंबरची मोरी वाहून गेली होती. चांदखेड येथील एक युवकही पुलावरून जाताना वाहून गेला. याची तत्परतेने दखल घेत या ठिकाणी नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले. काम चालू झाल्यानंतर पुलाची उंची वाढविण्याच्या मुद्यावरून एक वर्ष वाया गेले. यानंतर पुलाची उंची अधिक वाढविल्याने काही जागेच्या तांत्रिक मुद्यामुळे पुलाचे काम पुन्हा थांबले होते. मात्र, पुन्हा काम सुरू करण्यात आले. सध्या:स्थितीत पुलाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. सध्या वाहतूक सुरू आहे त्या साकव पुलाची वाहतूक वजन क्षमता दोन ते तीन टन एवढीच आहे. पण, गेल्या १५ ते २० वर्षापासून १५ ते २० टनांपर्यंत वाहतूक पुलावरून केली जात आहे. यामुळे हा खचत चाललेला साकव पूल केव्हाही कोसळून मोठी दुर्घटना होऊ शकते. तरीही कालबाह्य झ् पुलावरून वाहतूक सुरू ठेवली आहे.नवीन पुलाचे काम कासवाच्या गतीने सुरू आहे. पवन मावळातील हा मुख्य एकमेव पूल आहे. थुगाव येथील ४० वर्षांपूर्वीचा साकव पूलही धोक्याची घंटा देत आहे. पण, या पुलाकडे अधिकाऱ्यांची डोळेझाक सुरू आहे. कठडे तुटले असून पुलावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही मोऱ्या जीर्ण झाल्या आहेत. पुलाची डागडुजी गेल्या चाळीस वर्षात केलेली नाही. आढे, ओझर्डे, सडवली, बउर, थुगाव, शिवणे, कोथुर्णेतील नागरिकांसाठी हाच वाहतुकीचा मार्ग आहे.