शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

डीपी रस्त्याचा विकास कधी?

By admin | Updated: October 15, 2015 00:38 IST

पिंपळे सौदागर परिसरातील काही डीपी रस्ते विकसित झाले नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

शिवप्रसाद डांगे, रहाटणीपिंपळे सौदागर परिसरातील काही डीपी रस्ते विकसित झाले नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर काही रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना आणि वाहनचालकांना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे.कोकणे चौक ते शिवराजनगरदरम्यान छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर बारा मीटर रुंद डीपी रस्त्याचे आरक्षण आहे. त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता विकसित करण्यात आला आहे. मात्र, त्यापुढील रस्ता मागील अनेक दिवसांपासून ‘जैसे -थे’ आहे. पालिका प्रशासनाच्या संबंधित विभागाकडे यातील काही भूखंडाचा ताबाही दिला आहे, तरी पालिका ठोस भूमिका घेत नाही. या परिसरातील दिवसेंदिवस नागरी वस्ती वाढत आहे. तसेच गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. मात्र, रस्ताच नसल्याने व आहे तो रस्ता योग्य नसल्याने नागरिकांना जा-ये करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या या ठिकाणी नियोजित रस्त्यापैकी निम्मा रस्ता आहे. मात्र, तोही योग्य नाही. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे आहेत. अनेक नागरिकांनी रस्त्यावर झाडे लावली आहेत. या रस्त्यावर अनेक खड्डे पडल्याने खड्ड्यात रस्ता, की रस्त्यात खड्डे, अशी भयावह परिस्थिती आहे. या सर्व प्रकाराकडे पालिका प्रशासन निव्वळ डोळेझाक करीत आहे. खरे तर रहाटणी परिसर पालिका हद्दीत आहे की नाही, असाच प्रश्न काही वेळा पडल्याशिवाय राहत नाही. नियोजित डीपी रस्ते, उद्यान अनेक चांगल्या सामाजिक प्रकल्पासाठी पालिका प्रशासनाने आरक्षण टाकले. मात्र, ते विकसित करण्यासाठी सध्याचे अधिकारी, कर्मचारी मागे-पुढे पाहत आहेत. लाखो रुपये मिळकत कर पालिकेला येथील नागरिकांकडून भराला जात असूनसुद्धा पालिका प्रशासन सामान्य गरजासुद्धा भागवू शकत नाही. त्यामुळे येथील रहिवाशी, वाहनचालक वैतागले आहेत.