शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सीमानिश्चितीला आठवड्याची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 02:00 IST

पिंपरी-चिंचवड शहराच्या मूळ आणि वाढीव हद्दीच्या विकास आराखड्यातील आरक्षणे विकसित न केल्याबद्दल महापौर राहुल जाधव यांनी नगररचना विभागास धारेवर धरले.

पिंपरी  - पिंपरी-चिंचवड शहराच्या मूळ आणि वाढीव हद्दीच्या विकास आराखड्यातील आरक्षणे विकसित न केल्याबद्दल महापौर राहुल जाधव यांनी नगररचना विभागास धारेवर धरले. सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक जागा ताब्यात असलेल्या आरक्षणांचे डिमार्किंग आठवड्यात करावे, असे आदेश प्रशासनास दिले आहेत. आदेशाचे पालन न केल्यास कडक कारवाई करू, असेही निर्देश दिले आहेत.महापालिका क्षेत्रातील आरक्षणांचा विकास व्हावा, यासाठी महापौरांनी पुढाकार घेतला आहे. यांसदर्भात आज बैठक झाली. त्या वेळी महापौरांनी प्रशासनाच्या कामावर नाराजी व्यक्त केली. ‘आपण ज्या कामाचे वेतन घेतो, ते काम तरी प्रामाणिकपणे करा. मला आठवड्यात आरक्षणांचे डिमार्किंग संदर्भात माहिती हवी आहे. न मिळाल्यास कामचुकारांवर कारवाई केली जाईल, असा सज्जड दमही दिला़ते म्हणाले,‘‘महापालिका हद्दीत मंजूर विकास योजनेतील आरक्षण, रस्ता तसेच मंजूर विकास योजनेव्यतिरिक्त महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत घोषित रस्ता खासगी वाटाघाटीने ताब्यात घेता येतो. त्यासाठी रेडीरेकनरनुसार होणारे मूल्यांकन अधिक ३० टक्के दिलासा रक्कम अशी मिळून एकत्रित होणारी रक्कम देण्याची पद्धत प्रचलित आहे. नव्याने विकसित होणारे रस्ते आणि इतर आवश्यक रस्त्यांकरिता खासगी वाटाघाटीने भूसंपादन करणे शक्य आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहे.रस्ते आरक्षणाला प्राधान्यरस्ते विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. रस्त्यांसाठी ७० टक्के जागा ताब्यात आली असल्यास उर्वरित ३० टक्के जमिनीचा ताबा घेण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येईल. बाधितांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी खासगी वाटाघाटी करण्यात येईल. एफएसआय अथवा टीडीआर देण्यात येईल. प्रपत्र ब भरून घेण्यात येईल. यापैकी एकही पर्याय मान्य नसेल तर कायदेशीर कारवाई करून जागा ताब्यात घेण्यात येईल. त्यासाठी नगररचना, स्थापत्य आणि बांधकाम परवानगी विभागात समन्वय साधला जाईल. आरक्षणे ताब्यात आल्याशिवाय स्मार्ट सिटी होणार नाही.’’ 

 

 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या