शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बोलतो तेच करतो, म्हणून इतिहास घडवू शकलो: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By विश्वास मोरे | Updated: February 22, 2023 23:16 IST

सत्ता आणि खुर्चीच्या मोहापायी  शिवसेनेला दावणीला बांधण्याचे पाप; आम्ही मोठा कार्यक्रम केला

पिंपरी: गेल्या विधानसभा निवडणूकीत युतीला मतदारांनी कौल दिला. त्यानंतर मात्र, अघटीत घडल. आयुष्यभर ज्यांना  बाळासाहेबांनी विरोध केला. सत्ता आणि खुर्चीच्या मोहापायी काहींनी त्यांच्या दावणीला शिवसेनेला बांधण्याचे पाप केले. सत्तेवर आल्यानंतरही कारभार ठप्प राहिला. हट्ट आणि अहंकारापायी प्रकल्प बंद पडले. ही चूक असल्याची लोकभावना निर्माण झाली. त्यामुळे आम्हांला मोठा कार्यक्रम करावा लागला. तो आम्ही केला. मी बोलतो तेच करतो. म्हणून इतिहास घडवू शकलो. आम्ही मोठा कार्यक्रम केला. कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. सत्तेची हवा डोक्यात जाऊ देणार नाही, मी जागता पहारा देणारा मुख्यमंत्री आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केले.

रहाटणी येथील शिवेंद्र लॉन्समध्ये चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपा महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ  सभा झाली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, मंत्री तानाजी सावंत, माजी खासदार अमर साबळे, भाजपचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, भरत गोगावले, उमा खापरे, शंकर जगताप, विजय शिवतारे आदी उपस्थित होते.

श्रेय कोणाला घ्यायचे त्याला घेऊ द्या

लोकसेवा आयोगाच्या परिक्षांसंदर्भातील प्रश्नांचा उल्लेख करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘लोकसेवा आयोगाच्या परिक्षांबाबत आणि विद्यार्थ्यांची भूमिका मला पटली आहे. याबाबत मी दोनवेळा आयोगाला पत्रही लिहले आहे. काही जण श्रेय घेत आहेत. श्रेय घ्यायचे त्यांना घेऊद्यात. आपण काम करीत राहू.’’

आता मोर्चा काढावा लागणार नाही

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नांवर आता मोर्चा काढावा लागणार नाही. हा प्रश्न ठाण्याप्रमाणे कायमचा निकालात काढला जाईल. सिडकोप्रमाणे प्राधिकरणाचा साडेबारा टक्क्याचा विषय तातडीने मार्गी लाऊ. पाण्याचा प्रश्न, इंद्रायणी, पवना नदी सुधार प्रकल्प आराखडा तयार करायला सांगितला आहे. पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रोला मंजुरी देण्याची सूचना केली आहे. पुणे रिंगरोड लवकरच सुरू करू. ’’

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘सत्तेवर येताच अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. मी लोकांमध्ये मिसळतो. त्यांना भेटतो. म्हणून त्यांचे प्रश्न जाणतो. पूर्वी काय परिस्थिती होती, या खोलात मी जात नाही.’’

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना