शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याच्या टाक्या ठरताहेत धोकादायक

By admin | Updated: March 21, 2017 05:18 IST

येथील परांडेनगरमध्ये चार दिवसांपूर्वी साडेतीन वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

दिघी : येथील परांडेनगरमध्ये चार दिवसांपूर्वी साडेतीन वर्षीय बालकाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. टाकीत पडून मृत्युमुखी पडण्याची ही दिघीतील दुसरी घटना होय. त्यामुळे परिसरात होत असलेल्या बांधकामावरील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, बांधकाम व्यावसायिक यांनी सुरक्षिततेच्या नियमाला बगल दिल्याने निष्पाप मुलांचे नाहक बळी जात असल्याचे वास्तव आहे. दिघी परिसरात बांधकामांना पेव फुटले आहे. रस्तोरस्ती, गल्ली-बोळात सर्रास बांधकामांना ऊत आला आहे. या बांधकामावर असलेल्या मजूर, ठेकेदार यांच्याकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने कुठलेही नियम पाळले जात नाहीत.उंच ठिकाणी काम करताना सेफ्टी बेल्टचा वापर टाळत बांधकामावरील कामगार वर्ग जिवावर उदार होऊन काम करताना दिसतो. हेल्मेट, गॉगल, हातमोजे, सेफ्टी बूट अशी सुरक्षेबाबतची कुठलीही साधने, साहित्य ठेकेदाराकडूनच पुरविले जात नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्याशिवाय बांधकाम क्षेत्रात धोकादायक ठरणाऱ्या जागा सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता वाऱ्यावर सोडून दिले असतात. यामध्ये बांधकामांना लागणाऱ्या पाण्याचा साठा करण्यासाठी भूमिगत बांधलेल्या पाण्याच्या टाक्या उघड्यावर सोडलेल्या असतात. दिघीतील परांडेनगरमध्ये पाण्याच्या टाकीत पडून सुमीत अनिल चौहान या साडेतीन वर्षाच्या बालकाचा अंत झाला. तर एका बांधकामावर एक कामगार खालून विटा फेकत होता व दुसरा कामगार त्या वरच्यावर झेलत गोळा करत असताना हातातील निसटलेली वीट बालकाच्या डोक्यात पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. सुरक्षेचे उपाय नाकारल्याने त्याची झळ आपल्याच कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला सोसावी लागल्याचे समोर आले आहे. बांधकामावर बांधलेल्या पाण्याच्या टाक्या सुरक्षित नसल्याचे उघड झाले आहे. प्रत्येक बांधकामावर हिच परिस्थिती आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून त्यावर सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत झाकण करणे सोईचे असताना लाकडी फळी टाकून वेळ निभावून नेली जाते. हीच दुर्लक्षित केलेली बाब जवळपास खेळणाऱ्या लहान मुलांच्या जिवावर उठली असून, टाकीमध्ये बालक पडण्याच्या घटना घडत आहेत. लहान मुलांच्या जिवाशी खेळणाऱ्या व या घटनांना जबाबदार असणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. जेणेकरून अशा घटना वारंवार घडणार नाहीत. (वार्ताहर)