शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत

By admin | Updated: April 26, 2017 03:50 IST

नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करताना जुन्या पाण्याच्या पाईपलाईनवरच जेसीबीने खोदकाम करण्याचा प्रयत्न केल्याने सेनापती

खडकी : नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम करताना जुन्या पाण्याच्या पाईपलाईनवरच जेसीबीने खोदकाम करण्याचा प्रयत्न केल्याने सेनापती बापट रोडवर पाईपलाईन फुटण्याची घटना सोमवारी दुपारी ४च्या सुमारास घडली़ यामुळे चतु:शृंगी पाण्याच्या टाकीचा पाणीपुरवठा बंद करावा लागला़ त्यामुळे औंध, भोसलेनगर, खडकी, बोपोडी या भागाच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला़ औंध, पाषाण परिसरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्यासाठी एसएनडीटी पाणीपुरवठा केंद्रातून चतु:शृंगी येथील पाण्याच्या टाकीपर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरू आहे़ चतु:शृंगी मंदिराजवळ जेसीबीने खोदकाम सुरू असताना अचानक खाली पाण्याची जुनी लाईन लागली़ जेसीबीच्या टोकदार दाताने खोदण्याचा प्रयत्न करताच पाईप लाईनला तो घाव बसून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा फवारा आकाशात झेपावला़ हा फवारा आकाशात काही मीटर उंच उडत होता़ या पाण्याने शेजारच्या बंगल्यावर जणू पाऊस कोसळत असल्याचा भास होत होता़ चालकाने जेसीबीचे तोंड त्यावर ठेवून पाणी कमी करण्याचा प्रयत्न केला़ जवळपास अर्धा तास ही गळती सुरू होती़ त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले़ याबाबत चतु:शृंगी पाणीपुरवठा केंद्राचे अधिकारी वीरेंद्र केळकर यांनी सांगितले, की आता पाणीपुरवठा बंद केला असून टाकीत जेवढे पाणी जमा झाले आहे ते सोडले जाईल़ यामुळे औंध, भोसलेनगर, खडकी, बोपोडी या परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे़ रात्री उशिरा दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला़ गेल्या आठवड्यातही गणपती मंदिर चौकात याच पाईपलाईनसाठी खोदकाम करताना महावितरणच्या केबल तुटल्या होत्या़ (प्रतिनिधी)