शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शहराला पाणीपुरवठा होत असलेला बंधारा निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:58 IST

नियोजनाअभावी पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ

वडगाव मावळ : तीव्र उन्हाळ्यामुळे मावळ तालुक्यातील धरणांतील पाण्याचा साठा कमी होऊ लागला आहे. वडगावला पाणीपुरवठा होत असलेल्या जांभूळ धरणाचा बंधारा निकामी झाला आहे. त्या बंधाऱ्यातून आणि शहरात पाण्याचे नियोजन नसल्याने ऐन उन्हाळ्यात धो धो पाणी वाया जात आहे.वडगाव शहराची लोकसंख्या सुमारे तीस हजार आहे. सुदैवाने शहरात पाण्याची उपलब्धता योग्य आहे. परंतु नियोजन नाही. काही भागात कमी प्रमाणात पाणी येते. काही ठिकाणी नळाला थेंब थेंब पाणी येते, तर काही भागात जोरदार दाबाने पाणी येते. नळपाणी पुरवठा करण्यासाठी नागरिकांना अर्धा इंच पाइपलाइन टाकून नळ कनेक्शन द्यावे, असा नियम आहे. परंतु ग्रामपंचायत असताना अनेकांनी हा नियम धाब्यावर बसवून एक इंची पाइपलाइन टाकून नळावाटे पाणीपुरवठा सुरू करून घेतला आहे. त्यामुळे त्यांना जादा दाबाने पाणी मिळते. काही भागात मोटार लावून पाणी घेतले जाते. त्यामुळे आजूबाजूला नळांना पाणी येत नाही.वडगाव शहराला इंद्रायणी नदीवरून जांभूळ येथील बंधारा, कातवी व सांगवी येथील जॅकवेलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून पूर्वी जांभूळ येथील इंद्रायणी नदीवर बंधारा बांधला. त्या बंधाऱ्यातून शहराला पाणीपुरवठा होतो. नदीतून येणारे हे पाणी शहरातील शिंदे टेकडी, डेक्कन हिल, न्यू इंग्लिश स्कूल, संस्कृतीनगर, म्हाळसकर वस्ती, हरणेश्वर टेकडी, मिलिंदनगर, कातवी व टाटा हौसिंग येथील आठ पाण्यांच्या टाक्यांमध्ये पाणी साठवून शहराला पाणीपुरवठा केला जातो. लोकसंख्येच्या मानाने शहराला मुबलक पाणी असतानाही शहरातील काही भागात सुरळीत पाणीपुरवठा होत नाही यासाठी नगरसेवकांनी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.वडगाव शहराला पाणीपुरवठा होत असलेला जांभूळ येथील बंधारा पूर्णपणे निकामी झाला आहे. तो कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे अन्यथा तो कोसळल्यास शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होऊ शकतो. हा बंधारा दुरुस्तीसाठी नगर पंचायतीत तीन महिन्यांपूर्वी ठराव झाला. अद्यापही कामाला सुरुवात नाही. भविष्यात हा बंधारा फुटला, तर शहरातील पाणीपुरवठा बंद होऊ शकतो.मुख्याधिकारी : कारवाई करणारनळपाणी पुरवठा योजनेला अर्धा इंची पाईप घेणे हा शासनाचा नियम आहे. मात्र अनेकांनी तो मोडून एक वा दीड इंची घेतला आहे. याबाबत लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी दिली. जांभूळ बंधाºयाचे कामही लवकर केले जाईल.मुख्य पाइपलाइनवरून मोटार लावून पाणी घेणे बंद केले पाहिजे.तत्काळ बंधारा दुरुस्ती,संपूर्ण शहरात समान पाणीवाटप,ज्यांनी अनधिकृतपणे एक इंची पाइपलाइन वापरली ती काढावी