शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धिविनायकनगरीत पाणीटंचाई

By admin | Updated: March 31, 2017 02:48 IST

देहूरोड कॅन्टोन्मेन्ट हद्दीतील निगडीतील सिद्धिविनायकनगरी, दत्तनगर परिसरात पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होत

देहूरोड : देहूरोड कॅन्टोन्मेन्ट हद्दीतील निगडीतील सिद्धिविनायकनगरी, दत्तनगर परिसरात पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होत असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेत मावळचे आमदार, महापालिका पदाधिकारी व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पदाधिकारी व संबंधित नागरिक यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत चर्चा झाल्यांनतर संबंधित भागात पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन महापौर नितीन काळजे यांनी दिले . महापौर काळजे यांच्या कक्षात झालेल्या बैठकीला मावळचे आमदार बाळा भेगडे, महापौर नितीन काळजे, आयुक्त दिनेश वाघमारे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, नगरसेविका सीमा सावळे, नामदेव ढाके, बाळासाहेब ओव्हाळ, सारंग कामतेकर, कॅन्टोन्मेन्ट मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित सानप, बोर्डाच्या उपाध्यक्षा अ‍ॅड. अरुणा पिंजण, सदस्य विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, भाजपचे देहूरोड शहराध्यक्ष कैलास पानसरे, तानाजी काळभोर यांच्यासह संबंधित भागातील नागरिक उपस्थित होते. कॅन्टोन्मेंट हद्दीतील वॉर्ड क्रमांक पाच व सहात निगडीतील सिद्धिविनायकनगरी, दत्तनगर, समर्थनगरी, परमार कॉम्प्लेक्स, आशीर्वाद कॉलनी हा भाग येतो. या भागात सुमारे दहा हजार लोकसंख्या असून, सुरुवातीपासून महापालिकेकडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र गेले काही दिवस लोकसंख्येच्या तुलनेत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना टॅँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ येत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. या वेळी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या वतीने महापौर काळजे व आयुक्त वाघमारे यांना निवेदन देण्यात आले.(वार्ताहर) सर्वत्र पाणीटंचाई जाणवू लागली असून, पाणीपुरवठा करताना अडचणी येत आहेत. संबंधित भागात पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, महापालिका व कॅन्टोन्मेंटचे अधिकारी स्थळपाहणी करून लवकरच पाणीपुरवठा समस्येवर तोडगा काढतील.- नितीन काळजे, महापौर ४आमदार भेगडे यांनी पुरेसा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. चर्चेत महापौर काळजे, नगरसेविका सावळे, बोर्ड सदस्य खंडेलवाल, महापालिकेचे पाणीपुरवठा विभागातील अधिकारी रामदास तांबे, विशाल कांबळे यांनी भाग घेतला. सध्या फक्त दीड लाख लिटर पाणीपुरवठा होत असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.