शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका सोडतेय उत्पन्नावर पाणी

By admin | Updated: October 15, 2016 02:54 IST

नियोजनाच्या अभावामुळे येथील नागरिकांच्या खिशाला दंडाची चाट पडत आहे. तर महापालिका उत्पन्नाच्या स्रोतावर पाणी सोडत आहे. पार्किंगसाठी जागा असूनही पार्किंगच्या समस्येने

निगडी : नियोजनाच्या अभावामुळे येथील नागरिकांच्या खिशाला दंडाची चाट पडत आहे. तर महापालिका उत्पन्नाच्या स्रोतावर पाणी सोडत आहे. पार्किंगसाठी जागा असूनही पार्किंगच्या समस्येने डोके वर काढल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र परिसरामध्ये दिसत आहे. पण, डोळ्याला पट्टी बांधणाऱ्या अधिकाऱ्यांना जाग कधी येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.टिळक चौकात पीएमपीचा मुख्य बसथांबा असून, येथून पिंपरी-चिंचवड शहरासह पुण्यातील विविध भागांत बस सुटतात. त्यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्याही अधिक आहे. यासह विविध मुख्य शासकीय कार्यालयेदेखील याच परिसरात आहेत. त्यामुळे या चौक परिसरात नेहमीच वर्दळ असते. वाहनांसाठी वाहनतळ असतानाही त्या ठिकाणी वाहने उभी केली जात नसल्याने रस्त्यावरच ती वाहने अस्ताव्यस्त उभी असतात. निगडीतील टिळक चौकात असलेल्या संत तुकाराम व्यापार संकुलात वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था असूनही त्याचा वापर होत नसून, वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत. त्यामुळे हे प्रशस्त वाहनतळ धूळ खात पडून आहे.अनेक ठिकाणी जागेअभावी वाहनतळाचा प्रश्न निर्माण होत असताना निगडीतील व्यापार संकुलात मात्र उलट परिस्थिती असल्याचे दिसून येत आहे. प्रशस्त पार्किंग असतानाही त्याचा वापर होत नाही.आकुर्डी रेल्वेस्थानकाच्या परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी उभ्या केलेल्या असतात. यामुळे वाहतूककोंडी होण्यास भर पडत आहे. ‘नो पार्किंग’चा फलक लावला असतानाही त्याच्या समोरच वाहने राजरोसपणे उभी असतात. (वार्ताहर)