पिंपरी : रावेत येथील महापालिकेचे अशुद्ध जलउपसा केंद्र आणि सेक्टर क्रमांक २३ मधील जलशुद्धीकरण केंद्रात तातडीने तांत्रिक दुरुस्ती करण्यात येणार असल्याने गुरुवारी (दि. २८) संपूर्ण शहराचा सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरून उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून सहकार्य करावे, असे आवाहन सहशहर अभियंता (पाणीपुरवठा) यांनी केले. (प्रतिनिधी)
गुरुवारी सायंकाळी पाणीपुरवठा बंद
By admin | Updated: July 26, 2016 05:12 IST