शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

तरण तलावातून लाखो लिटर पाणी वाया

By admin | Updated: May 4, 2017 02:38 IST

पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मंगळवारपासून (दि. २) शहरात २५ टक्के पाणीकपात करून दिवसाआड

भोसरी : पवना धरणात केवळ ३७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिल्याने मंगळवारपासून (दि. २) शहरात २५ टक्के पाणीकपात करून दिवसाआड पाणीपुरवठा देण्याचे महापालिकेने जाहीर केले. पण सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या प्रशासनाकडून मात्र शहरातील १२ तरण तलावांवर पाण्याची अक्षरश: उधळपट्टी चालली असून, सर्वसामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याच्या या प्रकाराबद्दल सर्वसामान्य नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहराला दररोज सुमारे ४१० लाख लिटर पाण्याची गरज आहे. पवना धरणातील अपुरा जलसाठा पाहता ती पूर्ण करणे अशक्य असल्याने पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच शहरातील सर्व जलतरण तलावांत कूपनलिकांद्वारे पाणीपुरवठा होतो, असे जरी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असले, तरी प्रत्यक्षात सर्वच तलावांवर महापालिकेचे पाणी वापरले जात असल्याचे दिसून येते. कारण अनेक ठिकाणच्या कूपनलिका बंद आहेत, तर काही ठिकाणी कूपनलिका कार्यान्वित असूनही त्या पाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करणे ठेकेदारांना परवडत नसल्याने सर्रास महापालिकेच्या पिण्यायोग्य पाण्याचाच वापर केला जात असल्याचे दिसून येते. तसेच शॉवरसाठीही दररोज १० हजार लिटर पाण्याचा अपव्यय एका तलावात होत असल्याचे चित्र आहे. भोसरी येथील तलावावर दररोज ८ बॅचमध्ये सुमारे १००० नागरिक जलतरणाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत असतात. येथे महिला व पुरुषांसाठी एकूण २० शॉवरची व्यवस्था आहे. पोहण्यापूर्वी व पोहल्यानंतर शॉवर घेण्यासाठीचे पाणीही महापालिकेचेच असल्याने मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. येथील सर्वच शॉवरच्या जाळ्या गायब झालेल्या असून पाण्याची गळती चालूच असते. महापालिकेचे पाणी बर्फ बनवणाऱ्या कंपन्या तसेच इतर रासायनिक कंपन्यांना दिले जाते. बाटलीबंद पाणी कारखाने व जार बॉटलमार्फत दररोज लाखो लिटर पाणी शहराबाहेर पाठवले जात असल्याने शहरवासीयांच्या हक्काचे पाणी पळवण्याचा हा प्रयत्न असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पाणीटंचाईच्या परिस्थितीत अशा व्यवसायांवरही पाणी वापराबाबत बंधन घालणे गरजेचे असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)दुर्लक्ष : पाण्याचा पुनर्वापर फक्त कागदावर महापालिकेची उद्याने व जलतरण तलावांत पाण्याचा पुनर्वापर केला जात असल्याने पाण्याचा अपव्यय होत नाही असे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात पुनर्वापर यंत्रणा ठेकेदारांना बंधनकारक असूनही तिचा वापर टाळला जात असल्याचे चित्र सर्वत्रच दिसून येते. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात नसल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.