शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रॉम वॉटर चेंबरचा वापर कचऱ्यासाठी

By admin | Updated: December 22, 2015 01:10 IST

रस्त्यावर साचणारे पावसाचे पाणी योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी महापालिकेने शहरातील अनेक रस्त्यांवर जमिनीखालून स्ट्रॉम वॉटर लाइन टाकली आहे

रहाटणी : रस्त्यावर साचणारे पावसाचे पाणी योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी महापालिकेने शहरातील अनेक रस्त्यांवर जमिनीखालून स्ट्रॉम वॉटर लाइन टाकली आहे. या लाइनवर ठरावीक अंतरावर चेंबर तयार करण्यात आले आहे. काही ठिकाणी चेंबरच्या जाळ्या लोखंडी आहेत, तर काही ठिकाणी सिमेंटच्या आहेत. पाणी चेंबरमध्ये जाण्यास अडथळा होऊ नये, म्हणून जाळ्यांचे होल मोठे ठेवण्यात आले आहेत. मात्र, याचा फायदा महापालिकेच्या झाड़ूखात्याच्या कर्मचाऱ्यांनाच होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या अनेक ठिकाणचे चेंबर कचऱ्याने भरले आहेत.पावसाचे पाणी योग्य प्रकारे निचरा होण्यासाठी रस्त्यावर जमिनीखालून स्ट्रॉम वॉटर लाइन टाकण्यात आली. त्यावर ठिकठिकाणी चेंबर तयार करण्यात आले . असे चेंबर साफ करण्यासाठी महापालिका प्रशासन वर्षाकाठी लाखोंचे टेंडर काढते. तरी नाले, चेंबर साफ होत नाहीत. त्यामुळे रस्त्यावर पाणी थांबते. ही बाब वेगळीच आहे. सध्या रस्ते साफसफाई करणारे कर्मचारी कामात कसूर करत असल्याचे दिसून येत आहे . दर वर्षी सर्वसामान्य नागरिकांकडून मिळकतकरात साफसफाईकर मोठ्या प्रमाणात वसूल केला जातो .मात्र महापालिका प्रशासन या रकमेतून ठेकेदार पोसण्याचे काम करीत आहे. नाले साफसफाई ठेकेदाराकडे,रस्ते साफसफाई ठेकेदाराकडे त्यामुळे सर्वच ठेकेदार गबर होत आहेत. एका ठेकेदाराने रस्त्यावरचा कचरा साफ करून चेंबरमध्ये टाकायचा. तो कचरा काढण्यासाठी दुसऱ्याने तो जादा दराने पुन्हा ठेका घ्यायचा. हा मिलीभगत व्यवहार नागरिकांच्या डोळ्यांत धूळ फेकण्याचे काम महापालिका अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)