शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

रहाटणी परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

By admin | Updated: May 10, 2017 04:10 IST

पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून पालिका प्रशासन वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र आपले शहर खरेच

लोकमत न्यूज नेटवर्करहाटणी : पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर राहावे म्हणून पालिका प्रशासन वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र आपले शहर खरेच स्वच्छ व सुंदर आहे का, असा प्रश्न नागरिकांना सतावत आहे. कारण रहाटणी परिसरात अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. काही ठिकाणी कचराकुंडी नसल्याने नागरिक मोकळ्या जागेत कचरा टाकीत आहेत. अनेक वेळा हा कचरा वाऱ्यामुळे रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रभाग क्रमांक २७ रहाटणी येथील रहाटणी चौक, नखाते वस्ती चौक, रहाटणी फाटा, गोडांबे कॉर्नरसह अनेक ठिकाणी परिसरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. पूर्वी या ठिकाणी कचराकुंड्या होत्या. मात्र घरोघरी कचरा उचलण्यासाठी गाड्या जात असल्याचे कारण पुढे करीत परिसरातील कचराकुंड्या काढून टाकण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी कचराकुंड्या होत्या, त्या ठिकाणी ‘कचरा टाकू नये’असे फलक लावले आहेत. तरीही नागरिक या ठिकाणी कचरा टाकीत आहेत. नागरिकांच्या मते कचरा उचलणाऱ्या गाड्या दोन-दोन दिवस येत नसल्याने नागरिकांची फसगत होत आहे. घरात कचरा किती दिवस ठेवायचा, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. त्यामुळे नागरिक नाईलाजाने पूर्वी कचराकुंड्या होत्या, त्या ठिकाणी सर्रास कचरा टाकीत आहेत. हा कचरा एवढ्या प्रमाणात साचत आहे की, काही वेळा हा कचरा आहे त्याच ठिकाणी कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे परिसरात डासांच्या प्रमाणात वाढ होत असून, त्यामुळे साथीच्या आजाराला प्रोत्साहन मिळत आहे. सध्या परिसरात साथीच्या विविध आजारांनी नागरिक हैराण आहेत. पालिका रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांच्या रांगा दिसून येत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने परिसरातील ठिकठिकाणी साचलेला कचरा रोजच्या रोज वेळेवर उचलण्याची मागणी होत आहे.