शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग पद्धतीनुसार इच्छुकांचे आडाखे

By admin | Updated: January 9, 2016 01:35 IST

आगामी महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार की, वॉर्ड पद्धतीने याबाबत संभ्रम असतानाच गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका

पिंपरी : आगामी महापालिका निवडणूक प्रभाग पद्धतीने होणार की, वॉर्ड पद्धतीने याबाबत संभ्रम असतानाच गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुका प्रभाग पद्धतीने होणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातही विविध पक्षांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांसह इच्छुकांकडून आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेबु्रवारी २०१७ मध्ये होत आहे. त्या दृष्टीने प्रशासनासह सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदारयादी आदी गोष्टींकडे बारकाईने लक्ष ठवले जात आहे. आरक्षण कसे पडेल, कुठला प्रभाग राखीव असेल, आपणाला कुठून संधी मिळेल, यासह वार्ड अथवा प्रभागरचना कशी असेल, कुठला भाग आपल्याकडे आल्यास फायदा होऊ शकतो आदींबाबत आडाखे बांधले जात आहेत. यातील प्रमुख मुद्दा म्हणजे निवडणूक प्रभागानुसार होणार की, वॉर्डनुसार हा समजला जात आहे. त्यातच २०१२ ची निवडणूक प्रभाग पद्धतीने झाल्याने आगामी निवडणूक वॉर्ड पद्धतीने होईल, असा अनेकांना अंदाज होता. त्यानुसार प्रशासनासह इच्छुकांनीही तयारी सुरू केली आहे. मात्र, गुरुवारी मुख्यमंत्र्यांनी प्रभाग पद्धतीने निवडणुका होणार असल्याचे संकेत दिल्याने राजकीय गणिते बदलावी लागणार आहेत. यंदा पुन्हा प्रभाग पद्धतीने निवडणूक झाल्यास कोणाला फायदा आणि कोणाला फटका बसेल, तसेच वॉर्ड पद्धतीने झाल्यास काय होईल, याबाबतही चर्चा होती. प्रभाग पद्धतीत दोन अथवा त्यापेक्षा अधिक नगरसेवक असतात. त्यांच्यात वाद असल्यास त्याचा विकासकामांवर परिणाम होतो. तर वॉर्डमध्ये स्वतंत्ररीत्या काम करता येते. त्यामुळे वॉर्ड पद्धतीने निवडणूक झाल्यास फायदेशीर ठरेल, असे प्रादेशिक पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)