शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीपासून जागे करावे

By admin | Updated: March 23, 2016 00:54 IST

समृद्ध जीवन, शारदा चिटफंडसारख्या संस्थांनी आर्थिक घोटाळे करून देशातील लाखो लोकांची फसवणूउक केली. आर्थिक अज्ञान आणि जास्त पैसा मिळतो या हव्यासापोटी लोक अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करतात

पिंपरी : समृद्ध जीवन, शारदा चिटफंडसारख्या संस्थांनी आर्थिक घोटाळे करून देशातील लाखो लोकांची फसवणूउक केली. आर्थिक अज्ञान आणि जास्त पैसा मिळतो या हव्यासापोटी लोक अशा संस्थांमध्ये गुंतवणूक करतात. त्यामुळे सनदी लेखापालांनी समाजातील अशा अज्ञानी लोकांना माहिती देऊन त्यांची फसवणूक टाळावी, असे मत खासदार अमर साबळे यांनी केले.सनदी लेखापाल संघटनेच्या पश्चिम विभागाच्या वतीने आयोजित पदवीदान समारंभात खासदार साबळे बोलत होते. या वेळी सीएची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २६ विद्यार्थ्यांना खासदार साबळे यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी सनदी लेखापाल संघटनेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सुहास गार्डी, केंद्रीय सदस्य शिवाजी झावरे, शिल्पा सिनगारे, प्राजक्ता चिंचोलकर उपस्थित होते.साबळे म्हणाले, ‘‘सीएंनी देशासाठी काम केले पाहिजे. सीए जोपर्यंत समाजात जात नाही तोपर्यंत त्यांच्या ज्ञानाचा फायदा होणार नाही. म्हणून आपल्या ज्ञानाचा फायदा समाजातील अज्ञानी लोकांसाठी झाला पाहिजे. तसेच गैरव्यवस्थापन करणाऱ्या संस्थांची माहिती घेऊन त्या संदर्भात लोकांना माहिती दिली पाहिजे.’’झावरे म्हणाले, ‘‘इतर देशांच्या तुलनेत भारतात सीएंची संख्या अतिशय कमी आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सीएंनी आधुनिक बनावे.’’ (प्रतिनिधी)