शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अप्पर आयुक्तांची प्रतीक्षा, दोन महिन्यांपासून कार्यालय रिकामेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:28 IST

उद्योगनगरीतील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी पिंपरी-चिंचवडला स्थलांतरित करण्याचा आदेश दिला.

पिंपरी : शहराच्या स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. प्रस्तावावरील पुढील कारवाईची प्रतीक्षा न करता, उद्योगनगरीतील गुन्हेगारी घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी पुणे शहर पोलीस आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वी वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी पिंपरी-चिंचवडला स्थलांतरित करण्याचा आदेश दिला.चिंचवड येथील परिमंडल तीनच्या उपायुक्त कार्यालयात अपर पोलीस आयुक्तांसाठी कक्ष तयार करण्यात आला. या इमारतीतून सहायक पोलीस आयुक्त राम मांडूरके यांचे कार्यालय भोसरीत स्थलांतरित केले. अपर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे चिंचवडच्या कार्यालयात येतील, अशी प्रतीक्षा केली जात असताना, त्यांची बदली सीआयडीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी झाली. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी येण्याची प्रतिक्षा कायम आहे.पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढू लागल्याने शासनाकडे स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी विविध स्तरावरून गेल्या अडीच वर्षांपासून पाठपुरावा होत आहे. स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला. मात्र, त्यावर पुढील हालचाली न झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात वरिष्ठ पोलीस अधिकाºयांचे कार्यालय स्थलांतरित करण्याच्या हालचालींना वेग आला. उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांचे चतु:श्रृंगीतील कार्यालय पिंपरीत स्थलांतरित करायचे. जेणेकरून वरिष्ठ दर्जाचे अधिकारी पिंपरी-चिंचवडला उपलब्ध होऊ शकतील, असा पर्याय पुढे आला. पुणे शहर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी जागेची पाहणी केली. पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत उत्तर प्रादेशिक विभाग आणि दक्षिण प्रादेशिक विभाग अशी प्रशासकीय कामकाजासाठी विभागणी केलेली आहे. दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांचे कार्यालय कोथरूडला स्थलांतरित करण्यात आले. त्याच धर्तीवर बदल करून उत्तर प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे यांचे कार्यालय पिंपरी-चिंचवडमध्ये स्थलांतरित करण्याचे निश्चित झाले. नागरिकांना तातडीक मदत मिळावी, या उद्देशाने स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुविधाही उपलब्ध करून देण्याचे नियोजन झाले. त्या दृष्टीने घाईघाईत प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.>सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाचे स्थलांतरपुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड येथे परिमंडल तीनचे उपायुक्त कार्यालय आहे. त्या इमारतीत उपायुक्त गणेश शिंदे यांचे कार्यालय खालच्या मजल्यावर आहे. त्याच इमारतीत सहायक पोलीस आयुक्त राम मांडूरके यांचे कार्यालय होते. मात्र, अपर पोलीस आयुक्त शिंदे यांच्यासाठी कार्यालय उपलब्ध व्हावे, याकरिता सहायक पोलीस आयुक्त मांडूरके यांचे कार्यालय भोसरीत स्थलांतरित झाले.चिंचवड येथील कार्यालयात अपर पोलीस आयुक्त शिंदे रुजू होतील, अशी नागरिकांना अपेक्षा होती. पोलीस आयुक्त शुक्ला यांनी सप्टेंबरमध्ये आदेश दिल्यानंतर प्रशासकीय सुविधा उपलब्ध झाल्या. काही बदलही झाले़ मात्र अतिरिक्त पोलीस आयुक्त शिंदे या कार्यालयास अद्यापपर्यंत वेळ देऊ शकले नाहीत. मागील आठवड्यात त्यांची सीआयडीच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाल्याने नागरिकांची आशा मावळली. त्यांच्याऐवजी अन्य कोणी वरिष्ठ अधिकारी पिंपरी-चिंचवडसाठी उपलब्ध होऊ शकेल का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. खून, खंडणी, अपहरण, टोळीयुद्ध अशा गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडू लागल्याने पुन्हा स्वतंत्र पोलीस आयुक्तालय व्हावे, या मागणीचा जोर वाढला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड