शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मतदान जनजागृती फलक ‘जैसे थे’च!

By admin | Updated: May 5, 2017 02:39 IST

राजकीय पक्ष अथवा सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फलक लावल्यास महापालिकेचे अधिकारी ते फलक हटविण्याची घाई

पिंपरी : राजकीय पक्ष अथवा सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी फलक लावल्यास महापालिकेचे अधिकारी ते फलक हटविण्याची घाई करतात. एवढेच नव्हे तर दंडात्मक कारवाइचे पाऊल उचलतात. निवडणुकीच्या काळात फेब्रुवारीमध्ये महापालिकेने जनजागृतीसाठी लावलेले फलक मात्र निवडणूक उलटून दोन महिने झाले तरी आहे त्या जागेवरच आहेत. संबंधितांवर महापालिका प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. महापालिकेने निवडणूक काळात शहरात सर्वत्र नाही; परंतु काही प्रभागात जनजागृती फलक लावले होते. हे फलक लावण्यामागे जनगजागृती हा उद्देश असल्याचे भासवले गेले तरी विशिष्ट नगरसेवकांच्या प्रभागात महापालिकेच्या खर्चाने त्यांचा प्रचार व्हावा. असाच उद्देश त्यामागे होता. अशी शंका नागरिकांनी उपस्थित केली आहे. ‘आमची सोसायटी १०० टक्के मतदान करणार, तुम्हीही मतदान करा’ अशा आशयाचे फलक चिंचवड, अजमेरा कॉलनी परिसरात लावले होते. वास्तविक पाहता, शंभर टक्के मतदान करण्याचे सोसायटीतील सर्व सदस्यांनी ठरविले असेल, तर त्यांनी असे जाहिरात फलक लावणे अपेक्षित होते. महापालिकेने पुढाकार घेऊन खर्च करण्याची गरज नव्हती. मतदार याद्या तपासल्यास ज्या भागात असे १०० टक्के मतदानाचे फलक लावले होते. त्या भागात १०० टक्के मतदान झालेले नाही. महापालिकेच्या खर्चाने मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी काही अधिकाऱ्यांनी ही शक्कल लढवली होती. हे शहराच्या अन्य भागात असे फलक लावले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.  उपकाराची परतफेड म्हणून नगरसेवकांना निवडणुकीत मदत व्हावी, या उद्देशाने काही अधिकाऱ्यांनी जनजागृती फलक, मतदार  जनजागृती पथनाट्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारली.  पथनाट्यांचे सादरीकरण विशिष्ट भागातच झाले. पथनाट्यातूनही  छुप्या पद्धतीने प्रचार करण्यात  आला. एवढे सर्व काही झाल्यानंतर आता मतदार जनजागृती म्हणून लावलेले फलक काढून टाकण्याचे भान महापालिका अधिकाऱ्यांना राहिले नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)