शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गट, गणांसाठी आज मतदार देणार कौल

By admin | Updated: February 21, 2017 02:52 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी मध्यरात्रीनंतर थंडावल्या. जिल्हा परिषदेच्या ५ गट

वडगाव मावळ : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारतोफा रविवारी मध्यरात्रीनंतर थंडावल्या. जिल्हा परिषदेच्या ५ गट आणि पंचायत समितीच्या १० गणांसाठी मंगळवारी (दि. २१) तालुक्यातील २१६ केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी १४२८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले. साहित्य नेण्यासाठी अधिकाऱ्यांची गर्दी झाली होती. मावळातील काही दुर्गम ग्रामीण गावे ही तहसील कार्यालयापासून ५० ते ५५ किलोमीटर दूर असल्यामुळे अशा गावांतील मतदान केंद्रावर वेळेत पोहोचण्यासाठी अधिकारी गडबड करताना दिसत होते. या सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष भागडे व तहसीलदार जोगेंद्र कट्यारे मार्गदर्शन करत होते. काही समस्या असल्यास त्या मांडण्याचे आवाहनही करत होते. प्रत्येक मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी एसटी बसची सुविधा करण्यात आली होती.जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी २०, तर पंचायत समितींच्या १० जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी १ लाख ७६ हजार ३७८ मतदार असून, यामध्ये ९२ हजार ३५३ पुरुष, तर ८४ हजार २५ महिला मतदार आहेत. मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी व एक शिपाई असे एकूण पाच अधिकारी-कर्मचारी राहणार आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्याचे तहसील कचेरीत वाटप करण्यात आले. ४३२ ईव्हीएम मशिन, स्टेशनरी, मतदारयादीचे वाटप करण्यात आले. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयातच साहित्य चेक करून घेतले, नंतर ते आपापल्या मतदान केंद्रावर रवाना झाले. (वार्ताहर)तालुक्यातील जिल्हा परिषदेचे ३ गट, तर पंचायत समितीचे ५ गण संवेदनशील आहेत. यामध्ये इंदोरी-सोमाटणे गटात सोमाटणे, बेबडओहळ ही गावे तर वडगाव- खडकाळा गटात खडकाळा, महागाव -चांदखेड गटात आढे आणि आढले बु ही गावे अतिसंवेदनशील आहेत. या मतदान केंद्रांवर मतदानप्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी यासाठी या केंद्रांवर १०० मीटरवर पोलीस कर्मचारी नियुक्ती व सेक्टर पेट्रोलिंग करण्यात येणार आहे. निवडणूक बंदोबस्तासाठी २९३ पोलीस कर्मचारी, ५४ होमगार्ड व १६ पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.तालुक्यातील मतदारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे. मतदान करणे हा आपला अधिकार व कर्तव्य आहे. त्यामुळे सर्वांनी घराबाहेर पडून मतदान करावे. तसेच निवडणूक कामासाठी नेमलेल्या अधिकाऱ्यांनी नि:पक्षपणे आपले काम करावे. काही गैरप्रकार आढळल्यास त्वरित मला किवा जवळील पोलिसांशी संपर्क करावा. - सुभाष भागडे, निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी