शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांची संक्रांत गोड

By admin | Updated: January 15, 2017 05:24 IST

महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून शनिवारी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत इच्छुकांकडून घरोघरी खास ‘वाण’ देत संक्रांत गोड करण्यात आली.

पिंपरी : महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून शनिवारी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधत इच्छुकांकडून घरोघरी खास ‘वाण’ देत संक्रांत गोड करण्यात आली. महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरू आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्याचे निमित्त इच्छुकांकडून शोधले जात आहे. प्रत्येक उमेदवाराची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. वाढदिवसासह छोट्या-मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून इच्छुक मतदारांकडे जात आहेत. अशातच वेगवेगळ्या सणांचेही निमित्त साधले जात आहे. त्यामुळे इच्छुकांकडून शनिवारी सकाळपासूनच मकर संक्रांतीनिमित्त भेटवस्तू नागरिकांच्या घरी पोहोचल्या. भांड्यांचा सेट, चांदीचा करंडा, डिनर सेट, पर्स, गृहोपयोगी वस्तू भेट स्वरूपात देण्यात आल्या. तिळगूळवाटपासह भेटवस्तू देण्यासाठी इच्छुकांची धडपड सुरू होती. शनिवारी घरोघरी वाणाच्या स्वरूपात भेटवस्तू पोहोचविण्याचा धडाका सुरू होता. काही ठिकाणी तर पहिली भेटवस्तू पोहोचती तोच दुसऱ्या एका इच्छुकाकडून वाण पोहोचविले जात होते.(प्रतिनिधी)किमती वस्तू; महिला अवाक्एरवी परिसरातील महिलांसह कुटुंबातील महिला यांच्यात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होतो. छोट्या वस्तू वाण म्हणून देत कार्यक्रम पार पडतो. मात्र, यंदाच्या वर्षी महापालिका निवडणूक असल्याने प्रभागातील इच्छुकांनी कार्यक्रमांचे आयोजन करीत विविध स्वरूपाचे अन् किमती वस्तू वाण म्हणून दिल्याने महिलाही अवाक् झाल्या. - संक्रांतीनिमित्त देण्यात येणाऱ्या वस्तू पॅकिंग करून देण्यात येत होत्या. यावर इच्छुकांचे छायाचित्र यासह संक्रांतीच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. कोणत्या प्रभागातून इच्छुक आहे. याबाबतचा प्रभाग क्रमांकही त्यावर नमूद असल्याचे दिसून आले.- नागरिकांना भेटवस्तू देण्यासाठी इच्छुकांनी संबंधित भेटवस्तू दोन दिवसांपूर्वीच मागवून घेतल्या आहेत. यामुळे इच्छुकांची संपर्क कार्यालये भेटवस्तूंनी भरल्याचे चित्र दिसत होते. त्यानंतर शनिवारी सकाळपासूनच या वस्तू मतदारांपर्यंत पोहोचल्या. समोरचा इच्छुक कोणती वस्तू देणार, याचा अंदाज घेत त्यापेक्षाही दर्जेदार वस्तू देण्याचा प्रयत्न इच्छुकांकडून होत होता. महिला इच्छुकांनी तर घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रचाराचा मुहूर्त साधला. - निवडणुकीसाठी कमी अवधी शिल्लक असल्याने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांना कसरत करावी लागणार आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यही कामाला लागले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रत्येक सदस्याला परिसरनिहाय प्रचाराचे नियोजन दिले असून त्यानुसार मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. शनिवारी भेटवस्तू वाटपासाठीही इच्छुकांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्यही प्रचारात उतरले होते.