शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीचा ‘चेहरा’ झाला सुस्पष्ट

By admin | Updated: October 7, 2014 06:51 IST

मतदार यादीमध्ये छायाचित्र समाविष्ट करण्याच्या आवाहनाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून, जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के मतदारांचे छायाचित्र

पुणे : मतदार यादीमध्ये छायाचित्र समाविष्ट करण्याच्या आवाहनाला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून, जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत समाविष्ट करण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. लोकसभा निवडणुकीत हेच प्रमाण ८८ टक्के होते. मतदारांचा चेहरा स्पष्ट होणार असल्याने बोगस मतदानाला आळा बसणार आहे. मतदार यादीत छायाचित्र देण्यात ग्रामीण भागातील नागरिकांनी तत्परता दाखविली असून, शहरी मतदार मात्र त्याबाबत तुलनेने उदासीन असल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील किमान ९२ टक्के मतदारांचे फोटो मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार मतदारांनी मतदार यादीत फोटो समाविष्ट करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले होते. जिल्ह्यातील ६९ लाख २७ हजार ३७९ मतदारांपैकी ६० लाख ८८ हजार २३२ मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत आहे. जिल्हा प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही ७ लाख ३२ हजार मतदारांनी छायाचित्राची पूर्तता केलेली नाही. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मतदार अधिक सुज्ञ ठरले आहेत. ग्रामीण भागातील विधानसभा मतदारसंघामध्ये ९६ टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांचे छायाचित्र आहे. तर शहरी भागातील मतदारसंघात सरासरी ८० टक्के मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र आहे. बारामती मतदारसंघात सर्वाधिक ९९.८६ टक्के मतदारांनी छायाचित्राची पूर्तता केली आहे. तर पिंपरी मतदारसंघात केवळ ७४ टक्के मतदारांनी आपले छायाचित्र देणे पसंत केले आहे.